विद्यार्थ्यांचे पाच मोबाइल चोरीला

#आळंदी बसमधून प्रवास करत असलेल्या विद्यार्थ्यांचे पाच मोबाइल फोन चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे.

Fivemobilephonesstolen

विद्यार्थ्यांचे पाच मोबाइल चोरीला

गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात व्यक्तीने बसमधील प्रवाशांचे ४७ हजार रुपये किमतीचे पाच मोबाइल फोन चोरून नेले. आळंदी येथील देहू फाटा बसथांब्यावर २९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पावणेपाच ते साडेपाचच्या दरम्यान चोरीची ही घटना घडली. संकेत शरद चव्हाण (१९, रा. देहू फाटा, आळंदी) यांनी शुक्रवारी (दि. १) याप्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिस उपनिरीक्षक अवधुत शिंगारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संकेत चव्हाण हे विद्यार्थी आहेत. ते आणि त्यांचे काही विद्यार्थी मित्र देहू फाटा बसथांब्यावरून पीएमपीमएमएल बसने प्रवास करत होते. त्यावेळी गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने संकेत आणि इतर विद्यार्थ्यांचे ४७ हजार रुपये किमतीचे पाच मोबाइल फोन चाेरून नेले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest