सार्थकला देणार पाच लाखांचे अर्थसहाय्य, स्थायी सभेत मंजुरी
या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्या प्रस्तावास आयुक्त शेखर सिंह यांनी शुक्रवारी (१ मार्च) मान्यता दिली आहे.
चिंचवडगाव येथील हुतात्मा चापेकर शाळेत १६ फेब्रुवारी २०२४ रोजी अत्यंत दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेत शाळेतील आठवीचा विद्यार्थी सार्थक हर्षवर्धन कांबळे हा शाळेतील जिन्यातून खाली येताना दुसऱ्या मजल्यावरून पडला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या पालकांना आर्थिक मदतीची मागणी अनेक सामाजिक संघटनांनी केली होती. तसेच, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
त्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेने अखेर या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून त्यांना पाच लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी २०१४ मध्ये महापालिकेच्या एका शाळेत विद्यार्थ्यांच्या भांडणात ऋषिकेश बापू सरोदे या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी राज्य शासनाच्या आदेशानुसार त्याच्या पालकांना दोन लाखांची आर्थिक मदत करण्यात आली होती. त्याच आधारे पालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.