अखेर रुग्णालयाचा मार्ग मोकळा

िपंपरी-चिंचवड महापालिका तळवडेमध्ये उभारणार मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पिटल, संयुक्त बैठकीत पालकमंत्री अजित पवारांची सूचना, ५० हजार नागरीकांना आरोग्यविषयक सुविधा

waytothehospitalisclear

अखेर रुग्णालयाचा मार्ग मोकळा

रेड झोन हद्दीतील तळवडे परिसर विकासकामांकामापासून वंचित राहिलेला आहे. या परिसरात महापालिकेकडून कामे करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र, तळवडे प्रभागात मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पिटल उभारण्याची सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहेत.

तळवडे, रुपीनगर, जोतीबानगर, त्रिवेणीनगर, गणेशनगर, ताम्हाणेवस्ती तसेच सहयोगनगर हा परिसर शहरापासुन दुर आहे. या परिसरासाठी महापालिकेचे कोणतेही रुग्णालय जवळचे नाही. तळवडे व चिखली परिसर देहू कॅन्टोमेंटच्या २ हजार यार्डाच्या परिघात येत असल्याने येथे कोणतेही बांधकाम अनुज्ञेय नसून  विकासकामात बाधा येत नाही. या भागात पुर्वीपासून राहणाऱ्या रहिवाशांना आरोग्यविषयक मुलभुत सुविधा पुरवण्यास अडचणी निर्माण होत आहेत. जवळपास कोणतेही हॉस्पिटल नसल्याने अपघात, सर्पदंश अथवा हृदयविकारासारखा त्रास झाल्यास नागरीकांना उपचार वेळेत मिळत नाही. त्यामुळे नागरिकांना जीव गमवावा लागतो.

तळवडे येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची जागा उपलब्ध आहे. ठिकाणी बहुतेक आयटी कंपन्या असल्याने या परिसरात कंपन्यांपासून कोणतेही ध्वनी व वायू प्रदुषण होत नाही. त्यामुळे तळवडे येथे हॉस्पिटल उभारण्यास एमआयडीसीच्या ए- ३४ या १७ हजार ९४० चौरस मीटर या भूखंडावर बांधलेली १० हजार ५१० चौरस मीटर चटई क्षेत्राची इमारत विनावापर शिल्लक आहे. ती इमारत सुस्थितीत असून त्यामध्ये कायदेशीर बदल करून सदरची इमारतीत हॉस्पिटल सुरु करावे, यासाठी माजी नगरसेवक पंकज भालेकर यांनी सातत्याने पाठपुरावा करत आहेत. हॉस्पिटलसाठी इमारत बांधण्यास मनपास कोणताही अतिरिक्त खर्च करावा लागणार नाही. ही बाब उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर एमआयडीसी अधिकारी व महापालिका आयुक्त यांची संयुक्त बैठक घेत एमआयडीसीची जागा हॉस्पिटलसाठी देण्याबाबत अजित पवार यांनी तातडीने सूचना केल्या आहेत. त्यामुळे तळवडे, रुपीनगर, जोतीबानगर, त्रिवेणीनगर, गणेशनगर, ताम्हाणे वस्ती, सहयोगनगरसह चिखली या भागातील रहिवाशांना आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे. तळवडे आयटी पार्क येथील एमआयडीसीच्या जागेत महापालिकेकडून हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. त्यामुळे रेड झोन हद्दीमुळे रुग्णालयाचा प्रश्न कित्येक वर्ष प्रलंबित होता. यामुळे आता रुग्णालयाचा प्रश्न निकाली निघणार आहे. तेथील सुमारे ४० ते ५० हजार नागरिकांना वेळेत औषधोपचार मिळणार आहे.

तळवडे परिसर देहू कॅन्टोमेंटच्या दोन हजार यार्डाच्या परिघात येतो. त्यामुळे आमचा परिसर महापालिका हद्दीत असूनही 'नो डेव्हलमेंट' झोन आहे. त्यामुळे ४० ते ५० हजार रहिवाशी नागरिकांना पायाभूत आणि मुलभूत प्रश्न सोडवण्यासाठी कित्येक वर्ष झाले संघर्ष करावा लागला आहे. त्यामुळे एमआयडीसीच्या जागेत मनपा रुग्णालय सुरु झाल्यास नागरिकांना औषधोपचार मिळणार आहेत. पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नामुळे रुग्णालय उभारणीचा प्रश्न मार्गी लागला आहे.

- पंकज भालेकर, माजी नगरसेवक, तळवडे

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest