अखेर 'दिवाळी भेट'ला बसला चाप

पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरणामध्ये (पीएमआरडीए) दिवाळीच्या तोंडावरती अधिकाऱ्यांना खुश करण्यासाठी गर्दी वाढली होती. बांधकाम व्यावसायिक, एजंट, आर्किटेक्ट यांच्याकडून अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी सुरू होत्या. मात्र, त्याची दखल घेत महानगर आयुक्तांनी अशा प्रकारांवर चाप लावला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Wed, 30 Oct 2024
  • 10:32 am
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

पीएमआरडीएच्या प्रवेशद्वाराजवळ सुरक्षारक्षकांकडून तपासणी सुरू, 'सीविक मिरर'च्या वृत्ताची आयुक्तांकडून दखल, विभागप्रमुखांना सूचना

पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरणामध्ये (पीएमआरडीए) दिवाळीच्या तोंडावरती अधिकाऱ्यांना खुश करण्यासाठी गर्दी वाढली होती. बांधकाम व्यावसायिक, एजंट, आर्किटेक्ट यांच्याकडून अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी सुरू होत्या. मात्र, त्याची दखल घेत महानगर आयुक्तांनी अशा प्रकारांवर चाप लावला आहे. प्रवेशद्वाराजवळच सुरक्षारक्षकांकडून तपासणी होत असून, भेटवस्तू घेऊन आलेल्यांना परत पाठवण्यात येत आहे. एवढेच नव्हे तर, कामाशिवाय इतर नागरिकांना कार्यालयात मोटर घेऊन येण्यासही मज्जाव करण्यात आला आहे. प्रत्येक विभागप्रमुखांना त्याबाबत सूचना दिलेल्या आहेत.

'पीएमआरडीए'त अधिकाऱ्यांची दिवाळी या मथळ्याखाली 'सीविक मिरर'च्या माध्यमातून वस्तुस्थिती मांडली होती. अधिकारी सुट्टीवर जाण्यापूर्वी त्यांची विशेष भेट घ्यावी, यासाठी बांधकाम व्यावसायिक, एजंट, ठेकेदार, सल्लागार आणि राजकीय पदाधिकारी यांनीही भेट पाठवून दिली होती. त्यामुळे पीएमआरडीएच्या विविध विभागांमध्ये हे फिरत असल्याचे दिसून आले. सर्वाधिक गर्दी ही बांधकाम परवानगी विभाग असलेल्या विकास परवानगी विभागात होती. दरम्यान, या प्रकल्पाची दखल घेऊन महानगर आयुक्त यांनी याबाबत ॲक्शन घेतली आहे. अशाप्रकारे कोणतीही गिफ्ट, भेटवस्तू स्वीकारू नये असे स्पष्ट आदेश दिले आहेत. एवढेच नव्हे तर प्रवेशद्वाराजवळ सुरक्षारक्षकांना त्याची तपासणी करण्याबाबत कळवले आहे. कार्यालयातील पार्किंगमध्ये विनाकारण वाहन लावता येणार नाही. तसेच, संबंधित व्यक्तीला नेमके कोणत्या ठिकाणी भेट घ्यायची आहे त्याची नोंद करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

पीएमआरडीएत पिंपरी-चिंचवड आणि पुणे या दोन्ही शहरांचाही समावेश होतो. त्यामुळे नामवंत बांधकाम व्यावसायिकांची प्राधिकरणामध्ये ये-जा सुरू असते. यापूर्वी अनेक नोंदणी प्रकल्प अधिकाऱ्यांकडून मंजूर करून घेण्यात आले. त्यामुळे आता दिवाळीच्या तोंडावर त्यांना खुश करण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांची लगबग होती. हे प्रकार रोखण्यासाठी आता थेट महानगर आयुक्त यांनीच पावले उचलली आहेत.

 पीएमआरडीमध्ये भेटवस्तूंची चर्चा

पीएमआरडीए कार्यालयामध्ये विविध विभागांमध्ये चर्चा सुरू होती. त्याचप्रमाणे इतर अधिक विभागांमध्ये अधिकारी इलेक्शन ड्यूटी गुंतलेले असताना, केवळ बांधकाम परवाना विभागातच अधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेली या भेटवस्तू बाबत देवाणघेवाण आयुक्तांच्या कानावर पडली. त्या अनुषंगाने तातडीने दखल घेण्यात आली.

सुरक्षारक्षकांची कानउघडणी

विविध विभागांमध्ये नेमके काय चालू आहे, याबाबतची माहिती संबंधित सुरक्षारक्षकाला माहिती आवश्यक असते. मात्र ही बाब दुर्लक्ष केल्यामुळे आयुक्तांनी संबंधित सुरक्षारक्षकांच्या एजन्सीला याबाबत सुनावले. त्यानंतर काही सुरक्षारक्षकांच्या बदल्या देखील केल्या आहेत. त्यानुसार आता सुरक्षारक्षक देखील आपले काम चोखपणे बजावत असल्याचे दिसून येते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest