सासरच्या मंडळीच्या जाचाला कंटाळून जावयाची घेतला गळफास
घेतलेल्या पैशावरून सासरच्यांनी जावयाचा शारीरिक व मानसिक छळ केला या छळाला कंटाळून जावयाने राहत्या घरी गळफास घेत आपले जीवन संपवले आहे. ही घटना २५ ऑगस्ट २०२३ रोजी थेरगाव येथे घडली.
मुकेश धनीराम शर्मा (वय ३४ रा. सध्या थेरगाव,मूळ मध्यप्रदेश) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मुकेश याचा भाऊ राजकुमार धनीराम शर्मा (वय ३८ रा मध्य प्रदेश) यांनी वाकड पोलीस ठाण्यात सोमवारी (१६ ऑक्टोबर) फिर्यादी दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी मुकेश याच्या सासरकडील कृपाशंकर शर्मा (वय ६०), पंकज कृपा शंकर शर्मा (वय ३६) राघवेंद्र परमार (वय २८) व दोन महिला आरोपी सर्व राहणार मध्य प्रदेश यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकेश याने सासरकडून काही पैसे उसने घेतले होते. ते पैसे परत द्यावे म्हणून आरोपींनी त्याच्याकडे तगादा लावला होता. यातून ते मुकेशाचा शारीरिक व मानसिक छळ करत होते. या त्रासाला कंटाळून मुकेश याने थेरगाव येथील त्याच्या भाड्याच्या खोलीवर २५ ऑगस्ट रोजी रात्री पावणे नऊच्या सुमारास फॅनला वायारने गळफास घेतला. यावरून वाकड पोलिसांनी पाचही आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.