पीएमपीएमएल
पीएमपीएमएलकडून प्रवाशी नागरीकांच्या मागणीनुसार मार्ग क्रमांक ३०७ चिंचवड गाव ते शिंदे वस्ती रावेत या बसमार्गाचा विस्तार इस्कॉन मंदिर रावेत असा तर मार्ग क्रमांक ३६३ निगडी ते किवळे या बसमार्गाचा विस्तार समीर लॉन्स रावेत पर्यंत करण्यात आला आहे. मंगळवारी (दि. १६) समीर लॉन्स रावेत येथे भाजप आमदार अश्विनी जगताप यांच्या हस्ते दोन्ही विस्तारीत बसमार्गांचा लोकार्पण सोहळा पार पडला.
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते दिपक भोंडवे, संतोष भोंडवे, सोमनाथ भोंडवे, सचिन गावडे, पीएमपीएमएलचे प्र. कामगार व जनता संपर्क अधिकारी अल्ताफ सय्यद, निगडी डेपो मॅनेजर शांताराम वाघेरे, बालेवाडी डेपो मॅनेजर शैलेश नाईक आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यामध्ये मार्ग क्रमांक ३०७ - चिंचवड गाव ते इस्कॉन मंदिर रावेत या बससेवेचा मार्ग चिंचवड गाव, वाल्हेकरवाडी, शिंदे वस्ती, इस्कॉन मंदिर रावेत असा असणार आहे. तर मार्ग क्रमांक ३६३ - निगडी ते समीर लॉन्स रावेत या बससेवेचा मार्ग निगडी, देहू रोड, विकासनगर, किवळे, कातळे वस्ती, जे.के.टॉवर्स, समीर लॉन्स रावेत असा असणार आहे.
मार्ग क्रमांक ३०७ - चिंचवड गाव ते इस्कॉन मंदिर रावेतचे वेळापत्रक खालीलप्रमाणे
चिंचवड गावहून बस सुटण्याच्या वेळा – सकाळी ०७.१५, ०८.२५, ०९.३५, १०.५०, दुपारी १२.०५, ०४.००, सायंकाळी ०५.१५, ०६.३५
इस्कॉन मंदिर रावेतहून बस सुटण्याच्या वेळा – सकाळी ०७.५०, ०९.००, १०.१५, ११.३०, दुपारी १२.४५, ०४.३५, सायंकाळी ०५.५५, ०७.१०
मार्ग क्रमांक ३६३ - निगडी ते समीर लॉन्स रावेत चे वेळापत्रक खालीलप्रमाणे
निगडी हून बस सुटण्याच्या वेळा – सकाळी ०५.२५, ०६.१०, ०६.३५, ०६.५५, ०७.४०, ०८.०५, ०८.२५, ०९.१०, ०९.३५, ०९.५५, १०.४०, ११.०५, ११.५५ दुपारी १२.४५, ०१.०५, ०२.१०, ०२.५५, ०३.२०, ०३.४०, ०४.२५, ०४.५०, सायंकाळी ०५.१०, ०५.५५, ०६.२०, ०६.४०, ०७.२५, ०७.५०, रात्री ०८.४०, ०९.२५
समीर लॉन्स रावेत हून बस सुटण्याच्या वेळा – सकाळी ०६.१०, ०६.५५, ०७.२०, ०७.४०, ०८.२५, ०८.५०, ०९.१०, ०९.५५, १०.२०, १०.४०, ११.२५, ११.५० दुपारी १२.४०, ०१.३०, ०१.५०, ०२.५५, ०३.४०, ०४.०५, ०४.२५, सायंकाळी ०५.१०, ०५.३५, ०५.५५, ०६.४०, ०७.०५, ०७.२५, रात्री ०८.१०, ०८.३५, ०९.२५, १०.१०