संग्रहित छायाचित्र
माण -मारुंजी रस्त्यावर पुलाच्या कामादरम्यान हिंजवडी पोलीस ठाण्याच्या (Hinjawadi Police Station) हद्दीत रणगाड्याचा बॉम्ब सापडला. हिंजवडी पोलिसांनी हा बॉम्ब ताब्यात घेऊन संरक्षण विभागाच्या ताब्यात दिला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, माण-मारुंजी रस्त्यावर ब्ल्यूरिच सोसायटीच्या पाठीमागील बाजूला पुलाचे काम सुरु आहे. सोमवारी (३ एप्रिल) जेसीबीने खोदकाम करत असताना बॉम्ब सदृश वस्तू आढळून आली. त्यामुळे तत्काळ याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली.
हिंजवडी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन संबंधित वस्तूची पाहणी केली. रणगाड्यात बॉम्बचा पुढील भाग (बॉम्बशेल) असल्याचे आढळून आले. मात्र हे बॉम्बशेल खूप जुने असल्याने त्याला सुरक्षितपणे संरक्षण विभागाच्या ताब्यात देण्यात आले. संरक्षण विभागाकडून त्याची पाहणी करून त्याची विल्हेवाट लावली जाणार आहे.
चार महिन्यांपूर्वी सापडले होते हातबॉम्ब
शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गिकेच्या कामादरम्यान बाणेर येथे ५ डिसेंबर २०२३ रोजी जुने हातबॉम्ब सापडले होते. मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. चतुश्रुंगी पोलीस आणि बॉम्ब शोधक नाशक पथकाने (बीडीडीएस) बॉम्ब सुरक्षित स्थळी हलवले. ते ब्रिटीशकालीन बॉम्ब असल्याचे म्हटले होते.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.