संग्रहित छायाचित्र
पुणे विभागातील विविध ठिकाणच्या फेऱ्यांची संख्या घटत आहे. त्यामुळे त्याची तूट भरून काढण्यासाठी यंदाच्या उन्हाळी हंगामात प्रत्येक आगारास देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याचे सुद्धा केले आहेत. त्यासाठी त्या आगारातील वाहक व चालकांच्या किरकोळ सुट्ट्या रद्द केल्या आहेत. त्याबाबतचे पत्र सर्व आगारात पाठवण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवडसह बारामती, राजगुरुनगर, तळेगाव या ठिकाणच्या आगरात विविध लांब पल्ल्याच्या एसटी धावतात. गेल्या काही दिवसांपासून प्रवासीअभावी फेऱ्यांची संख्या घटत आहे. त्यामुळे मोठा प्रवासी वर्ग खासगी वाहतुकीकडे वळला आहे. त्याचा थेट परिणाम एसटीच्या उत्पन्नावर होत असल्याने या उन्हाळ्यात अधिकाधिक फेऱ्यांचे नियोजन करून उत्पन्नाच्या उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना पुणे विभागाकडून करण्यात आलेल्या आहेत. गेल्या चार ते पाच वर्षांपूर्वी पुणे विभागात सरासरी ९६० फेऱ्या होत होत्या. मात्र त्यानंतर त्यात होऊन फेऱ्यांची संख्या साडेसातशेवर आली आहे. त्यातच साडेपाचशेहून अधिक एसटीचे आयुर्मान संपुष्टात आले आहे. दहा ते चौदा वर्ष पूर्ण झालेल्या एसटीचे लाखोंच्या घरात किलोमीटर जाऊन पोचले आहे. वारंवार दुरुस्ती आणि कामामुळे एसटीचे काही पार्टदेखील निकामी होत आहेत.
दरम्यान, १० एप्रिल ते १५ जून या दरम्यान उन्हाळी हंगामासाठी नियोजन करण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या काळापासून त्या त्या आगारातील वाहक व चालकांचे सुट्ट्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. शालेय परीक्षा संपल्या आहेत. त्यामुळे गावी जाण्यासाठी आगारात गर्दी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, त्याबाबत आगार व्यवस्थापनास नियोजन करण्याच्या सूचना करण्यात आले आहे.
कर्मचारी वाढले; बस कमी
पिंपरी-चिंचवड आगार हे कोकणपट्ट्यासाठी ओळखले जाते. बहुतांश मार्ग कोकण परिघाचा असतो. दरम्यान, आगारातील जवळपास ६० बस मार्गावर आहेत. त्या तुलनेत चालकांची संख्या कमी होती. मात्र काही महिन्यापूर्वीच नवे चालक रुजू झाले आहेत. त्या तुलनेने नव्या एसटीची प्रतीक्षा आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.