आचारसंहितेचा भंग होऊ देऊ नका; महापालिकेने टोचले मेट्रोचे कान

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (Pimpri-Chinchwad Municipal Corporation) हद्दीत पिंपरी ते हॅरिस ब्रिज यादरम्यान महामेट्रो धावते. या मेट्रो मार्गातील मेट्रोच्या खांबावर नेहमीच राजकीय पक्ष, नेते, पदाधिकारी विविध राजकीय जाहिरातबाजी करतात.

PCMC

आचारसंहितेचा भंग होऊ देऊ नका; महापालिकेने टोचले मेट्रोचे कान

मेट्रोच्या खांबांवरील जाहिरातींवर लक्ष ठेवण्याची सूचना

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (Pimpri-Chinchwad Municipal Corporation)  हद्दीत पिंपरी ते हॅरिस ब्रिज यादरम्यान महामेट्रो धावते. या मेट्रो मार्गातील मेट्रोच्या खांबावर नेहमीच राजकीय पक्ष, नेते, पदाधिकारी विविध राजकीय जाहिरातबाजी करतात. यावर महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाकडून सातत्याने कारवाई करण्यात येते. मात्र, सध्या राज्यात आचारसंहिता लागू असल्याने या जाहिरातींच्या माध्यमातून आचारसंहितेचा भंग होऊ यासाठी महापालिकेने पत्र पाठवत महामेट्रो (Mahameetro) प्रशासनाचे काम टोचले आहेत.

मेट्रोचे खांब तुमच्या मालकीचे असून यावर आचारसंहितेचा भंग होईल, अशी कोणतीही जाहिरातबाजी होऊ देऊ नका, जाहिरातबाजी झाल्यास तत्काळ कारवाई करा, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. देशासह राज्यात मोठ्या प्रमाणात निवडणुकीचे वातावरण तापले आहे. सर्वच पक्षांचे उमेदवार प्रचारात दंग झाले आहे. सभा, बैठका, दौरे, भेटीगाठींनी मोठा वेग आला आहे. अनेकदा प्रचार करताना राजकीय लोकांकडून आचारसंहितेचा भंग होण्याची शक्यता असते. त्या संदर्भातील तक्रारीही निवडणूक विभागाकडे केल्या जातात. त्यामुळे महापालिका हद्दीत आचारसंहितेचा कोठेही आणि कोणत्याही प्रकारे भंग होऊ नये, यासाठी सर्वच प्रशासन काळजी घेत असते.

महापालिका हद्दीत मोठ्या प्रमाणात बोर्डिंग, फ्लेक्सद्वारे जाहिरातबाजी होत असते. आकाशचिन्ह व परवाना विभागामार्फत यावर लक्ष ठेवले जाते. जाहिरातींना परवानगी देणे, अनधिकृत जाहिरातींवर कारवाई करणे, हे काम या विभागाकडून केले जाते. दरम्यान, महापालिकेच्या हद्दीत पिंपरी ते हॅरिस ब्रीज या दरम्यान मेट्रो धावते. या मेट्रोच्या खांबावरील अनेकदा जाहिरात केली जाते. या जाहिरातींवर आकाशचिन्ह विभागाकडून वारंवार कारवाई करण्यात आली आहे. मात्र, सध्या आचारसंहिता लागू असल्याने काही जाहिरातींच्या माध्यमातून आचारसंहितेचा भंग होण्याची शक्यता आहे. शहरातील अनेक राजकीय व्यक्तींकडून मेट्रोच्या खांबांवर कायम जाहिरातबाजी केली जाते. यावर आकाशचिन्ह विभागाकडून कारवाईही होत असते. मात्र, असे प्रकार वारंवार होऊ नये यासाठी आकाशचिन्ह विभागाने थेट महामेट्रोला पत्र दिले आहे.

मेट्रोचे काम हे महा मेट्रोच्या मालकीचे आहेत. त्यावरील जाहिरातींची सर्व जबाबदारी ही महा मेट्रोचे आहे. आचारसंहितेच्या काळात या जाहिरातींच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारे आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी महामेट्रोने घ्यावी. संबंधित जाहिरातदारांवर योग्य ती कारवाई करावी, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

महापालिका हद्दीत पिंपरी ते हॅरिस ब्रीज या दरम्यान मेट्रो धावते. या मेट्रोच्या खांबांवर अनेकदा राजकीय जाहिराती लावल्या जातात. त्यामुळे सध्या आचारसंहितेचा भंग होऊ शकतो. हा प्रकार टाळण्यासाठी महामेट्रोला पत्र दिले आहे.-संदीप खोत, उपायुक्त, आकाशचिन्ह व परवाना विभाग

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest