जिवंत महिलेला वाहिली भावपुर्ण श्रद्धांजली, एका जणाविरोधात गुन्हा दाखल
मृत्यूची अफवा पसरवून जिवंत महिलेला सोशल मीडियाच्या (social media) माध्यमातून भावपुर्ण श्रद्धांजली वाहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार ३१ जानेवारी ते २३ मे २०२३ रोजीच्या दरम्यान पिंपरी चिंचवडमधील चऱ्होली येथे घडला आहे. या प्रकरणी एका जणाविरोधात दिघी (dighi) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चेतन रोहित सिंग (रा. शांतीनगर, विश्रांतवाडी, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेतनने संबंधित महिलेचा मृत्यू झाला आहे, अशी अफवा पसरवली. त्यानंतर व्हॉट्सअपवरती आणि इन्स्टाग्रामवरती अश्लिल कॉमेन्ट्स करत संबंधित महिलेचा व्हिडिओ @rizwanakhan_24 या टॅगसह NEED Justice यावर शेअर केला.
तसेच संबंधित महिलेच्या मुलाचा इन्स्टाग्राम अकाउंट heart_killer_addy आणि मुलीचे अकाउंट @zebakazi_khan या दोन्ही आयडीवर महिलेच्या नावाची भावपुर्ण श्रध्दांजलीची पोस्ट टाकली. आणि महिलेचा मृत्यू झाला आहे, अशी खोटी अफवा पसरवून बदनामी केली. अखेर बदनामीने त्रस्त झालेल्या महिलेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलीसांनी चेतन सिंगच्या विरोधात कलम ३५४ (ड), ५०६, ५०९,५०० नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास दिघी पोलीस करत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.