देहूनगरीत इंद्रायणीकाठी भाविकांची अलोट गर्दी

दिंड्यांनी केलेला जागर, काकडारती, महापूजा, हरिपाठ अन् वीणा, टाळ, मृदंग, चिपळ्यांची साथ अशा उत्साही आणि भक्तिमय वातावरणात बीज सोहळ्यास अलोट गर्दी बुधवारी पाहण्यास मिळाली.

देहूनगरीत इंद्रायणीकाठी भाविकांची अलोट गर्दी

लक्षावधी भाविकांनी केला नांदुरकीच्या वृक्षावर फुलांचा वर्षाव, नेत्रदीपक सोहळ्याने भाविकांचे पारणे फिटले

पंकज खोले

दिंड्यांनी केलेला जागर, काकडारती, महापूजा, हरिपाठ अन् वीणा, टाळ, मृदंग, चिपळ्यांची साथ अशा उत्साही आणि भक्तिमय वातावरणात बीज (Tukaram Beej) सोहळ्यास अलोट गर्दी बुधवारी पाहण्यास मिळाली. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा ३७५ वा त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी सदेह वैकुंठगमन सोहळा वारकऱ्यांनी आज अनुभवला; तसेच नांदुरकीच्या वृक्षावर तुळशीपत्र आणि पान फुलांचा वर्षाव करून लाखो वारकरी, भाविक वृक्षासमोर नतमस्तक झाले.

या सोहळ्यासाठी बुधवारी (२७ मार्च) लाखो वारकरी, भाविक; तसेच अनेक दिंड्या देहूनगरीत दाखल झाले होत्या.संत तुकाराम महाराज मुख्य मंदिर, वैकुंठस्थान मंदिर, श्री संत तुकाराम महाराज जन्मस्थान मंदिर व परिसरात अखंड हरिनाम सप्ताह सुरु होता; तसेच बीज सोहळ्यानिमित्त परिसरात हरिपाठ, भजन, कीर्तन आणि टाळ- मृदुंगाचा गजर ऐकू येत होता. अवघी देहूनगरी ‘ज्ञानोबा- तुकाराम’ च्या नामघोषाने दुमदुमली होती. विविध ठिकाणांहून आलेल्या वैष्णवांच्या मेळ्यामुळे देहूनगरीतील वातावरण भारून गेले होते. वैकुंठस्थान मंदिर आणि परिसर भाविकांच्या उपस्थितीने फुलून गेला होता. लाखो भाविकांनी उन्हाच्या तडाख्यातही तासन्तास रांगेत उभे राहून तुकोबारायांचे दर्शन घेतले. दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.

सकाळी साडे दहा वाजता पालखीचे वैकुंठस्थानकडे प्रस्थान जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखीचे मुख्य मंदिरातून वैकुंठस्थान मंदिराकडे सकाळी दहा वाजता प्रस्थान झाले. विठूनामाचा तसेच ‘ज्ञानबा- तुकाराम’चा जयघोषात, टाळ मृदुंगाच्या गजरात सोहळा दुपारी पावणे बारा वाजता वैकुंठस्थान मंदिर येथे दाखल झाला. वारकरी,  भाविक- भक्तांनी आपल्या हातातील पान फुलांचा नांदुरकीच्या वृक्षावर वर्षाव केला. ‘ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय, तुकाराम महाराज की जय’ या जयघोषाने अवघी देहूनगरी दुमदुमून गेली होती. इंद्रायणी नदी घाटावर, संत तुकाराम महाराज मंदिर, गाथा मंदिर आणि श्री वैकुंठ गमन स्थान मंदिर येथे भाविकांची मोठी गर्दी झाली आहे होती.  

नगरपंचायतीने विविध सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या. पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा, स्वच्छता प्रभावी पणे उपलब्ध करून दिल्या होत्या. सुरक्षा व्यवस्थेचा आढावा पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी घेतला. घाटावर तसेच मंदिरात भाविकांनी रांगा लावून श्रींचे दर्शन घेतले. देहू परिसरात महिला, पुरुष भाविकांचे गर्दीने रस्ते फुलले होते. मंदिरात प्रभावी दर्शन व्यवस्थेने भाविकांचे सुलभ दर्शन झाल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले. इंद्रायणी नदी घाटावर देखील भाविकांनी गर्दी केली होती. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest