पिंपरी-चिंचवड वाहतूक अपडेट : बीज सोहळ्यानिमित्त देहूत वाहतूक बंद

संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज बीज उत्सव (Saint Shrestha Shri Tukaram Maharaj Seed Festival) बुधवारी (२७ मार्च) देहू येथे साजरा होत आहे. बीजनिमित्त संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज मंदिरात मोठ्या प्रमाणावर वारकरी दर्शनासाठी येतात.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Amol Warankar
  • Wed, 27 Mar 2024
  • 04:51 pm
Pimpri-Chinchwad traffic update

पिंपरी-चिंचवड वाहतूक अपडेट : बीज सोहळ्यानिमित्त देहूत वाहतूक बंद

पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे वाहतूक पोलिसांचे वाहनचालकांना आवाहन, देहू परिसरात छावणीचे स्वरूप

संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज बीज उत्सव (Saint Shrestha Shri Tukaram Maharaj Seed Festival)  बुधवारी (२७ मार्च) देहू येथे साजरा होत आहे. बीजनिमित्त संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज मंदिरात मोठ्या प्रमाणावर वारकरी दर्शनासाठी येतात. त्यामुळे देहूगाव परिसरात वाहतूक कोंडी (Traffic congestion) होत असते. ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी वाहतुकीत काही बदल केले आहेत. सोमवारपासून (२५ मार्च) लागू असलेले हे बदल २७ मार्च रात्री नऊ वाजेपर्यंत अथवा वाहतूक सुरळीत होईपर्यंत (अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून) सर्व प्रकारचे वाहनांचे वाहतुकीसाठी बंद (Traffic stop) राहणार आहे. वाहनचालकांनी या कालावधीत पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, अशी माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त विशाल गायकवाड यांनी दिली.

देहूगाव कमान (जुना मुंबई-पुणे हायवे) येथून देहूगावकडे येणाऱ्या सर्व वाहनांसाठी प्रवेश बंद करण्यात येणार आहे. (सार्वजनिक वाहतूक

बसेस व दिंडीतील वाहने वगळून) महिंद्रा सर्कलकडून फिजुत्सु कॉर्नर अथवा कॅनबे चौक / आयटी पार्क चौकाकडे येण्यास सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा. सर्व प्रकारच्या वाहनांस प्रवेश बंदी करण्यात येत आहे. (पर्यायी मार्ग महिंद्रा सर्कल ते निघोजे ते मोईफाटा मार्गे डायमंड चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.) तळेगाव-चाकण रोडवरील देहूफाटा येथून देहूगाव जाणारे रस्त्यावरून सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे.

(पर्यायी मार्ग सदर मार्गावरील वाहने एच.पी. चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.) नाशिक पुणे हायवेवरील चाकण तळेगाव चौक तसेच स्पायसर चौक येथून महिंद्रा सर्कल मार्गे आयटी पार्क / कॅनबे चौक जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे.(पर्यायी मार्ग मोशी भारतमाता चौक मार्गे इच्छित स्थळी जातील. तसेच दुसरा पर्यायी मार्ग महिंद्रा सर्कल इन्डुरन्स चौक एच.पी. चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.) देहू कमान ते १४ टाळकरी कमान ते भैरवनाथ चौक हा रस्ता सर्व प्रकारचे वाहनांसाठी बंद राहणार आहे. जुना पालखी चौक ते झेंडे मळा जाणारी वाहतूक वन-वे (एकदिशा मार्ग) करण्यात येत आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी जास्तीत जास्त सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेच्या करण्यात आले आहे.

वारकऱ्यांच्या सेवेसाठी  

बीज सोहळ्यातील वारकऱ्यांची सुविधा आणि सुरक्षितता आणि वारकऱ्यांना मिळणाऱ्या सोयी सुविधांची माहितीचा आढावा उपविभागीय अधिकारी संजय असवले यांनी घेतला. सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक येणार आहेत, भाविकांच्या सोयीसुविधा व सुरक्षिततेच्या दृष्टीने विविध शासकीय विभागाकडून कामाचे नियोजन करण्यात येत असते. भाविकांसाठी पाण्याचे टँकर, स्वच्छतागृह, सीसीटीव्ही कॅमेरे, विद्युत हायमास्क, पथदिवे दुरुस्ती, स्वच्छतेची कामे सुरू आहेत. अतिक्रमण होऊ नये यासाठी पांढरे पट्टेही मारण्यात आले आहेत. नदी प्रदूषण होऊ नये यासाठी ओढ्यातील दूषित पाणी बंद करण्यात आले आहे. गृहप्रकल्प व सोसायट्यांना एसटीपी सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सार्वजनिक सेवेसाठी पीएमपीएलच्या १२५ बसेस असणार आहेत. झेंडेमळा, क्रीडांगण आणि गायरान जागेवर बसेस वाहनतळ आहेत. बसेस रस्त्यांवर उभी राहू नये याची दक्षता घेण्यात आली आहे. समस्यांचे तत्काळ निवारण करण्यासाठी नगरपंचायत कार्यालयामध्ये आपत्कालीन निवारण कक्ष तयार करून प्रत्येक विभागातील अधिकारी अथवा कर्मचारी त्या ठिकाणी असावा, अशी सूचना यावेळी उपविभागीय अधिकारी असवले यांनी दिली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest