पालकांची फी परत करण्याची मागणी; पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा
क्रिएटिव्ह अकॅडमी मध्ये प्रवेश घेण्यासाठी अनेकांनी आगाऊ फी भरली आहे. मात्र अकॅडमीच्या संचालकावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्याने त्याला अटक झाली आहे. त्यामुळे आम्ही भरलेली कोट्यवधींची फी परत द्या, अशा मागणीसाठी पालकांनी पोलीस आयुक्त कार्यालयावर शुक्रवारी (५ एप्रिल) मोर्चा काढला.
रावेत येथील क्रिएटिव्ह अकॅडमीचा संचालक नौशाद शेख याच्यावर मागील काही दिवसांपूर्वी अनेक विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याचा गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात त्याला अटक झाली असून तो सध्या कारागृहात आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशासाठी अनेक पालकांनी फी भरली आहे. एका विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी लाखो रुपये फी आहे. पालकांचे फी स्वरूपात कोट्यावधी रुपये क्रिएटिव्ह अकॅडमीमध्ये अडकले आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.