राज्य सरकारविरोधात काँग्रेसचे पिंपरीत 'चिखल फेको' आंदोलन

राज्यातील भाजप नेतृत्वाखालील सरकार हे शेतकरी, कष्टकरी, दलित, अल्पसंख्याक, युवक, महिला, गरीब व सामान्यांच्या विरोधातील आहे. पुरोगामी महाराष्ट्रात हे सरकार समाजामध्ये द्वेष पसरवण्याचे काम करीत आहे. त्या विरोधात काँग्रेस आक्रमक झाली असून, शुक्रवारी (दि. २१) शहर काँग्रेसने पिंपरीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात युती सरकारच्या विरोधात प्रतिकात्मक चिखलफेक आंदोलन केले. यावेळी प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी सरकारविरोधात निदर्शने केली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Sat, 22 Jun 2024
  • 02:12 pm
pimpri chinchwad, 'throw mud' movement

राज्य सरकारविरोधात काँग्रेसचे पिंपरीत 'चिखल फेको' आंदोलन

पंकज खोले :
राज्यातील भाजप नेतृत्वाखालील सरकार हे शेतकरी, कष्टकरी, दलित, अल्पसंख्याक, युवक, महिला, गरीब व सामान्यांच्या विरोधातील आहे. पुरोगामी महाराष्ट्रात हे सरकार समाजामध्ये द्वेष पसरवण्याचे काम करीत आहे. त्या विरोधात काँग्रेस आक्रमक झाली असून, शुक्रवारी (दि. २१) शहर काँग्रेसने पिंपरीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात युती सरकारच्या विरोधात प्रतिकात्मक चिखलफेक आंदोलन केले.  यावेळी प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी सरकारविरोधात निदर्शने केली.

दहा वर्षांपासून भाजपा सरकारने राज्यातील औद्योगिक विकासाला खिळ घातली आहे. सरकारी नोकर भरती बंद केली आहे. स्पर्धा परीक्षा वेळेवर घेतल्या जात नाहीत, ज्या परीक्षा घेतल्या त्याला पेपरफुटीचे ग्रहण लागते, शेतकरी संकटात आहे तरी त्यांना मदत केली जात नाही. कांदा, कापूस, सोयाबीन यासह कोणत्याही शेतमालाला भाव नाही. सरकार किमान हमीभाव देत नाही. महागाई, बेरोजगारी, पेपरफुटी, महिला सुरक्षा, खते, बी-बियाणांचा काळाबाजार, चिखलात सुरू असलेली पोलीस भरती, राज्यातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था, श्रीमंतांची पोरं गोरगरिबांना गाडीखाली चिरडून मारत आहेत. तरुणींचे दिवसाढवळ्या रस्त्यावर खून पाडले जात आहेत. सत्ताधारी पक्षाकडून जाती-धर्माच्या नावाखाली सामाजिक शांतता भंग करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याकडे लक्ष देण्याऐवजी सरकार फक्त टेंडर काढणे, निधी वाटणे, कमिशन घेणे एवढेच काम करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. 

पिंपरी-चिंचवड जिल्हाध्यक्ष कैलास कदम, कविचंद भाट, अमर नाणेकर, विश्वनाथ जगताप, माउली मलशेट्टी, विठ्ठल शिंदे, शामला सोनवणे, बाबू नायर, शहाबुद्दीन शेख, हरीश डोळस, बाबा बनसोडे, जुबेर खान, भाऊसाहेब मुगुटमल, सचिन कोंढरे, मयूर जयस्वाल, गौरव चौधरी, वसंत वारे, सोमनाथ शेळके, वाहब शेख, ॲड. अशोक धायगुडे, ॲड. अनिकेत रसाळ, उमेश बनसोडे, करीम पूनावाला, मिलिंद फडतरे, आकाश शिंदे, ॲड. अनिरुद्ध कांबळे, इरफान शेख, सुरज गायकवाड, अमरजीत पाथीवार, दाहर मुजावर, अण्णा कसबे, मोहन अडसूळ, विशाल कसबे, रशीद अत्तार, केनीथ रेमी, विजय ओव्हाळ, गौतम ओव्हाळ, मेहबूब शेख, रवी कांबळे, अबूबकर लांडगे, विकास कांबळे, फिरोज तांबोळी, पराग भुजबळ, राजू वाळुंजकर, सर्जी वकी, दीपल भंडारी, विद्यानंद सोनटक्के, ॲड. प्रथमेश कांबळे आदी यावेळी उपस्थित होते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest