तहसीलदार कार्यालयावर काँग्रेसचा आक्रोश मोर्चा
पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी आज जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. मोर्चा आकुर्डी चौक ते तहसीलदार कार्यालय निगडी या मार्गावर काढण्यात आला.
जातीनिहाय जनगणना करून सर्व मागासवर्गीयांना आरक्षण देण्यात यावे, शेतकरी पिक विम्याचे पैसे तत्काळ देण्यात यावे, बेरोजगार युवकांसाठी त्वरित नोकर भरती करण्यात यावी, पेट्रोल डिझेल घरगुती वापराचा गॅस चे दर त्वरित कमी करण्यात यावे, राज्यात सध्या गाजत असलेल्या अमली पदार्थांच्या घटनांवर नियंत्रण करून संबंधितांना कठोर शासन करण्यात यावे या प्रमुख मागण्यांसाठी आज हवालदिल झालेल्या जनतेच्या भावनांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि त्यांचा आक्रोश व्यक्त करणाऱ्या जन आक्रोश मोर्चाचे आयोजन काँग्रेसच्या वतीने करण्यात आले.
या मोर्चा दरम्यान तहसीलदार कार्यालयासमोर निषेध सभेचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी अखिल भारतीय युवक काँग्रेसचे प्रवक्ते गौरव चौधरी, ज्येष्ठ महिला नेत्या शामलाताई सोनवणे, डॉ. कैलास कदम यांनी मनोगते व्यक्त केली.
याप्रसंगी बोलताना डॉ. कैलास कदम म्हणाले, "केंद्र सरकारच्या धोरणांमुळे एकंदरीतच कामगार, कष्टकरी, शेतकरी, सर्वसामान्य, नोकरदार, शिक्षक, विद्यार्थी, नागरिक, गृहिणी सर्व हवाल दिल झाले आहेत. प्रचंड महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार वाढवून सोबत ईडी, आयटी, सीबीआय या यंत्रणांचा गैर वापर करत राजकीय सुडाचे राजकारण या भाजपने देशाभरामध्ये सुरू केलेले आहे राज्यातली परिस्थिती पाहता देखील या तिघाडी सरकारच्या माध्यमातून केवळ आश्वासनांचा पाऊस आणि ठोस कृती कार्यक्रम काही नसल्याचे चित्र दिसून येत आहे, एकंदरीतच हवालदिल झालेली जनता आक्रोश करत आहे आणि या आक्रोष्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आम्ही हा मोर्चा आयोजित केला आहे. त्रस्त झालेली जनता हे सरकार उलथवून टाकल्याशिवाय राहणार नाही"
याप्रसंगी माजी महिला प्रदेशाध्यक्षा शामला सोनावणे, शिक्षण मंडळ माजी सभापती अभिमन्यू दहितुले, सेवादल अध्यक्ष विरेंद्र गायकवाड, वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, वरिष्ठ उपाध्यक्ष भरत वाल्हेकर, पिंपरी ब्लॉक अध्यक्ष विश्वनाथ जगताप, भोसरी ब्लॉक अध्यक्ष विठ्ठल शिंदे, युवक प्रवक्ता गौरव चौधरी, डॉक्टर सेल अध्यक्षा मनीषा गरुड, ग्राहक सेल अध्यक्ष झेविअर अंथोनी, पथारी सेल अध्यक्षा गौरी शेलार, व्यापारी सेल अध्यक्ष अमरजीत पाथवाल, ज्येष्ठ नागरिक सेल अध्यक्ष लक्ष्मण रुपनार, भाऊसाहेब मुगुटमल, अबूबकर लांडगे, उपाध्यक्षा अर्चना राऊत, भारती घाग, सुनीता जाधव, सुवर्णा कदम, शितल सिकंदर, बबिता ससाणे, सुनिता मिसळ, सविता भावके, मंगल विटकर, सुखमल शिंदे, रेखा साळवे, लता साळवे, बाबा बनसोडे, मिलिंद फडतरे, केनिथ रेमी, प्रा. किरण खाजेकर, हरीश डोळस, सतीश भोसले, आण्णा कसबे, पांडुरंग जगताप, भास्कर नारखडे, उमेश बनसोडे, राजू ठोकळे, सुरज गायकवाड, गौतम ओव्हाळ, सचिन गायकवाड, सौरभ शिंदे, रवि नांगरे, जुबेर खान, दीपक भंडारी, फिरोज तांबोळी, सोनू शेख, आकाश शिंदे आदिसह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी मोदी सरकार आणि राज्यातील तिघाडी सरकार आणि भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या मोर्चा दरम्यान मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच सामान्य नागरिकांची उपस्थिती होती.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.