देशात महागाई, बेरोजगारीने नागरिक त्रस्त, काँग्रेसचे पदाधिकारी नागपूरला रवाना
देशातील नागरिक महागाई, बेरोजगारीमुळे त्रस्त झाले आहेत. केंद्र आणि राज्य सरकार जातीजातीमध्ये तेड निर्माण करण्याचे काम करीत आहे. देशाला पुढे जाण्यासाठी आता काँग्रेस पक्ष योग्य पर्याय आहे. काँग्रेसच्या १३९ व्या वर्धापन दिनानिमित्त नागपूर येथे आयोजित केलेल्या "है तैयार हम" या मेळाव्यास राज्यातील लाखो नागरिक उपस्थित राहत आहेत या साठी पिंपरी चिंचवड मधून काँग्रेसचे सुमारे दीडशे पदाधिकारी आणि कार्यकर्ते बुधवारी रवाना होत आहेत अशी माहिती पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी दिली.
पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून बुधवारी काँग्रेसचे कार्यकर्ते शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली नागपूरला रवाना झाले.
यामधे विश्वनाथ जगताप, विठ्ठल शिंदे, ज्ञानेश्वर मलशेट्टी, विजय ओव्हाळ, डाॅ. मनिषा गरूड, भाऊसाहेब मुगुटम, बाळासाहेब बनसोडे, गौतम ओव्हाळ, मिलिंद फडतरे सुधाकर कुंभार, युनुस बागवान, निखिल भोईर, सतीश भोसले, इरफान पठाण, राजू ठोकळ, सुधाकर कुंभार, हरीश डोळस, आकाश शिंदे, जितेंद्र छाबडा, फिरोज तांबोळी, सौरभ शिंदे, प्रा. किरण खाजेकर, विशाल कसबे, ॲड. बाजीराव दळवी, शयान अन्सारी, सुरज गायकवाड, अमरजीत सिंग, चंदन गुप्ता, जय राऊत, शहाजात शेख, श्रीराम लवंगे, कैलास मकासरे, निर्मलाताई खैरे, शशिकांत जगताप, प्रकाश लोंढे, दिलीप जगताप, चिदानंद जमादार, बाबासाहेब वाघमारे, गौरीताई शेलार, अरुण डोळस, आशा डोळस, प्रमोद शेलार, लक्ष्मीबाई जठार आदींचा समावेश आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.