बारणे यांच्या विजयात चिंचवडचा सिंहाचा वाटा

मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी ९६ हजार ६१५ मते घेत तिस-यांदा खासदार म्हणून निवडणूक जिंकली आहे. मात्र, बारणे यांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे अडीच लाखाचे मताधिक्य मिळविता आले नाही. चिंचवड, पिंपरी आणि पनवेल वगळता बारणे यांना सर्वाधिक लीड घेता आले नाही.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Wed, 5 Jun 2024
  • 03:31 pm
Lok Sabha elections

संग्रहित छायाचित्र

स्थानिक उमेदवार असूनही संजोग वाघेरे राहिले पिछाडीवर, मावळ, कर्जत, उरणमध्ये वाघेरे-बारणे यांच्यात चुरशीची लढत

विकास शिंदे :
मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी ९६ हजार ६१५ मते घेत तिस-यांदा खासदार म्हणून निवडणूक जिंकली आहे. मात्र, बारणे यांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे अडीच लाखाचे मताधिक्य मिळविता आले नाही. चिंचवड, पिंपरी आणि पनवेल वगळता बारणे यांना सर्वाधिक लीड घेता आले नाही.

मावळ, कर्जत आणि उरणमध्ये बारणे आणि वाघेरे यांच्यात अटीतटीचा चुरशीची लढत पहावयास मिळाली. त्यामुळे चिंचवडचे सुमारे ७४ हजार ७६५, पनवेलमधून ३१ हजार तर पिंपरीतून १६ हजार ७३१ या तिन्ही विधानसभेतून चांगले लीड वगळता अन्य मतदारसंघात बारणे यांना मताधिक्य घेता आले नाही. केवळ पिंपरी-चिंचवड शहरातून सर्वाधिक ली़ड मिळाल्याने त्यांच्या विजय मार्ग सोपा झाला. तर महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे हे स्थानिक असूनही त्यांना प्रभाव दाखविता आला नाही. त्यामुळे पिंपरी चिंचवडमधून बारणे ९० हजाराचे मताधिक्य मिळवले आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात ३३ उमेदवार रिंगणात होते. मावळमध्ये २५ लाख मतदारांपैकी १४ लाख १८ हजार ४३९ मतदारांनी प्रत्यक्ष मतदानाचा हक्क बजावला होता. बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलामध्ये चोख पोलीस बंदोबस्तामध्ये मावळ मतदार संघातील मतमोजणीला सकाळी आठ वाजता सुरुवात झाली.

पहिल्या फेरीपासून श्रीरंग बारणे आघाडीवर होते. ते शेवटपर्यंत बारणे त्यांची आघाडी कायम राहिली. महाविकास आघाडीच्या संजोग वाघेरे यांना बारणे यांची आघाडी तोडता आली नाही. शेवटच्या 26 व्या फेरीत बारणे यांचा विजय जाहीर करण्यात आला. बारणे यांना मागील दोन लोकसभा निवडणुकीचा अनुभव आहे. २०१४, २०१९ या दोन्ही लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेच्या युतीमुळे बारणे यांचा विजय सर्वाधिक मताधिक्याने झाला. पण, यंदा राज्यात पक्ष फोडाफोडीच्या राजकारण झाले. त्यामुळे मावळात शिवसेना विरुध्द शिवसेना (उबाठा गट) अशी लढत झाली. या लढतीकडे राज्याचे लक्ष लागले होते. बारणे हे हॅट्रीक मारणार की संजोग वाघेरे काय चमत्कार घडवणारे, याकडे सर्वाचे लक्ष लागले होते.

दरम्यान, दोन वेळा खासदार असूनही बारणे यांना त्यांच्या अडीच लाख अपेक्षेप्रमाणे मताधिक्य मिळविता आले नाही. केवळ ९६ हजार मतावर विजय मिळवता आले. त्यात चिंचवड विधानसभेचा सर्वाधिक वाटा राहिला आहे. पनवेलमधून आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह शिवसेनेने केलेल्या कामामुळे ३१ हजाराचे लीड मिळाले. पण, कर्जत, उरण विधानसभेत बारणे यांच्या ऐवजी संजोग वाघेरे या नवख्या उमेदवाराला पसंती मिळाली. मावळ विधानसभेत राष्ट्रवादी आमदार सुनिल शेळके आणि भाजप माजी आमदार बाळा भेगडे हे दोघे असतानाही बारणे यांना साडेचार हजाराचे मताधिक्य मिळाले आहे. त्या विधानसभेत संजोग वाघेरे यांनी चांगली लढत दिली. तसेच चिंचवडमधून बारणे यांना ७४ हजार ७६५ तर पिंपरीतून १६ हजार ७६१ इतके मताधिक्य मिळाले.

त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातून बारणे यांना तब्बल ९० हजाराचे मताधिक्याची लीड मिळाल्यानंतर त्यांच्या विजयात सिंहाचा वाटा शहराने दिला आहे. परंतू, संजोग वाघेरे हे स्थानिक उमेदवार असूनही त्यांना पिंपरी-चिंचवड शहरातून आणखी मताधिक्य घेता आले नाही. त्यामुळे बारणे यांच्या विजयात पिंपरी-चिंचवडकरांनी भरघोस मताधिक्य दिले आहे.

मावळच्या जनतेने तिसऱ्यांदा माझ्यावर विश्वास टाकला आहे. मावळमधील सहाही आमदार, कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम केले. त्यांच्या मेहनतीचा विजय आहे. दहा वर्षे मतदारसंघात जनतेशी, नागरिकांशी एकरूप राहून काम केले. पिंपरी-चिंचवड शहरातील जनतेने माझ्यावर मोठा विश्वास टाकला आहे. शहरात माझा एक लाख हक्काचा मतदार आहे. राज्यातील चित्र वेगळे असताना माझा लाखोच्या फरकाने विजय होत आहे. लोकांशी एकरूप राहून काम केल्याचा विजय आहे. मतदारांना, महायुतीचे कार्यकर्ते, नेत्यांना विजयाचे श्रेय देतो. मतदारांनी नात्या-गोत्याला, पाहुण्या-रावळ्याला थारा दिला नाही. देशाच्या हिताला, विकासाला आणि मावळमध्ये मी करत असलेल्या कामाला प्राधान्य दिले.

- श्रीरंग बारणे, मावळ, विजयी उमेदवार

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest