भरदिवसा गोळ्या घालून तरुणाची हत्या
पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली आहे. शहरातील चिखली येथे अज्ञातांनी भरदिवसा तरुणावर गोळ्या झाडल्या आहेत. यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आज (सोमवारी) दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे.
सोन्या तापकीर असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. आज दुपारी अडीचच्या सुमारास अज्ञातांनी सोन्यावर गोळीबार केला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून केले आहेत. गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होता. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले आहे.
घटनेची माहिती मिळातच पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. पोलीसांनी पंचनामा करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, १२ मे रोजी तळेगाव दाभाडे किशोर आवारे यांची भरदिवसा गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून हत्या केली गेली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाचा आता पुन्हा गोळीबाराची घटना घडली. अवघ्या १० दिवसात भरदिवसा दुसरा खून झाल्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये दहशतीचे वातावरण पसरले असून कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे का ? असा प्रश्न निर्माण झाला आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.