महिलांवर हल्ला करत कोयता गँगने लुटले दागिने, एकावर वार
पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा कोयता गँगने धुडगुस घातला आहे. चिखलीत परिसरात कोयता गँगने रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांवर हल्ला केला. यावेळी त्यांच्याकडून मोबाईल, दागिने काढून घेण्याचे प्रकार समोर आले आहेत. हा प्रकार सोमवारी रात्री साडेबाराच्या सुमारास घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टोळक्यांनी हातात कोयते नाचवत दहशत पसरवली. त्यानंतर रस्त्याने जाणाऱ्या एकावर वार करण्यात आला. तसेच वाहनांची तोडफोड करत, रस्त्यावरील महिलांच्या गळ्यातून दागिने आणि मोबाईल हिसकावून त्यांनी पोबारा केला.
हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. पोलिसांकडून या आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.