संग्रहित छायाचित्र
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त (Dr. Babasaheb Ambedkar Jayanti) पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागात मिरवणुका काढल्या जातात. तसेच पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी हजारो अनुयायी शहरातील विविध भागातून येत असतात. या पार्श्वभूमीवर पिंपरी, भोसरी, हिंजवडी, सांगवी परिसरातील वाहतुकीत बदल (Changes in transportation) करण्यात आला आहे. हा बदल रविवारी (१४ एप्रिल) दुपारी १२ पासून मिरवणुका संपेपर्यंत असणार आहे. याबाबतचे आदेश वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी दिले आहेत. (Traffic Update)
महावीर चौक चिंचवडकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरीकडे सर्व्हिस रोडने जाणाऱ्या वाहतुकीस बंदी. या मार्गावरील वाहने चिंचवड डीमार्ट इन ग्रेड सेपरेटर मार्गे जातील. नाशिक फाट्याकडून बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरीकडे सर्व्हिस रोडने येणाऱ्या वाहनांना बंदी. ही वाहने डेअरी फार्म ग्रेड सेपरेटर इन व एचपी पेट्रोल पंप खराळवाडी ग्रेड सेपरेटर इन मार्गे जातील.
स्व. इंदिरा गांधी पूल ते बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरीकडे येणाऱ्या सर्व वाहनांना बंदी. ही वाहने मोरवाडी चौक मार्गे जातील. नेहरुनगर चौकाकडून बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरीकडे सर्व वाहनांना प्रवेश बंदी. या मार्गावरील वाहने कॉर्नर बसस्टॉप येथून मासुळकर कॉलनी मार्गे जातील. जय मल्हार खानावळ सम्राट चौकपासून मोरवाडी चौकाकडे जाणारा मार्ग सर्व वाहनांसाठी बंद असेल. सायन्स पार्ककडून मोरवाडी चौकाकडे येणारा मार्ग बंद असेल. या मार्गावरील वाहने ऑटो क्लस्टरकडून मदर टेरेसा उड्डाण पुलावरून जातील.
क्रोमा शोरूमकडून गोकुळ हॉटेलकडे जाणारा मार्ग बंद असेल. पिंपरी चौकाकडून पिंपरी पुलाकडे जाणारा मार्ग आवश्यकतेनुसार बंद करण्यात येईल.
अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांच्या वाहनांसाठी संत तुकारामनगर जवळील एचए कंपनीच्या पार्किंगमध्ये पार्किंगची सोय करण्यात आली आहे.
हॅरिस ब्रिज ते फुगेवाडी चौक सर्व्हिस रस्त्याने जाण्यास प्रवेश बंद असेल. हॅरिस ब्रिजने ग्रेड सेपरेटर मार्गे जाता येईल. बोपोडी संविधान चौकाकडून दापोडी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे जाण्यास बंदी असेल. या मार्गावरील वाहने हॅरिस ब्रिज दापोडी मार्गे इच्छित स्थळी जातील. शितळा देवी चौकाकडून दापोडी गावाकडे जाण्यास बंदी असेल. या मार्गावरील वाहने शितळादेवी चौकाकडून सांगवी मार्गे जातील. जुनी सांगवी पीएमपीएमएल शेवटचा बस स्टॉप नदी पुलावरून दापोडीकडे जाण्यासंबंधी असेल. या मार्गावरील वाहनांना माकन चौक किंवा ममतानगर चौकातून जाता येईल.
कस्तुरी चौक ते श्री शिवाजी महाराज चौकाकडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांना बंदी असेल. या मार्गावरील वाहने कस्तुरी चौक येथून उजवीकडे वळून विनोदी वस्ती मार्गे व डावीकडे वळून इंडियन ऑइल चौक मार्गे जातील. मेझा ९ चौकाकडून हिंजवडी गावठाणकडे जाणारी वाहतूक श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सरळ पुढे जाऊन इंडियन ऑइल चौक, कस्तुरी चौक, विनोदे वस्ती मार्गे जाईल. जांभूळकर जिम चौकाकडून हिंजवडी गावठाणकडे जाणारी वाहतूक जांभूळकर जिम चौकातच यू टर्न घेऊन परत इंडियन ऑइल चौक, कस्तुरी चौक, विनोदे वस्ती चौक मार्गे जाईल. मेझा ९ चौकाकडून श्री शिवाजी महाराज चौकाकडे जाणाऱ्या दोन लेनपैकी डावी लेन बंद असेल. सर्व वाहतूक उजव्या बाजूच्या लेनने सुरू राहील.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.