जीवघेण्या वाहतूक कोंडीतून चाकणकरांची होणार सुटका !
ओेंकार गोरे
चाकणकरांसह पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) आणि इतर वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. गजबजलेल्या चाकण (Chakan) औद्योगिक क्षेत्रातील सततच्या होणाऱ्या वाहतूक (Chakan Traffic) कोंडीतून नागरिकांची सुटका होणार आहे. तळेगाव, (Talegaon) आंबेठाण चौकातील महाराष्ट्र शासनाच्या एसटी बसचे थांबे शंभर मीटर पुढे नेले जाणार आहेत. तसेच मजूर अड्डा दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात येणार आहे.
औद्योगिक संघटनांच्या पुढाकाराने विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी वाहतूक समस्या सोडविण्यासाठी बैठक घेतली. या बैठकीत चाकणमधील वाहतूक कोंडीबाबतच्या उपाययोजनांबद्दल निर्णय घेण्यात आला. या बैठकीला पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष दीपक करंदीकर, फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीचे सचिव दिलीप बटवाल यावेळी उपस्थित होते.
चाकणमधील तळेगाव चौक, आंबेठाण चौकातील वाहतूक कोंडी मोठी समस्या बनलेली आहे. वाहनाच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. त्यामुळे उद्योग क्षेत्रातील कामगार वेळेवर कामाच्या ठिकाणी पोहोचू शकत नाहीत. याचा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. चाकणमधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी येत्या सात दिवसांत अतिक्रमणे काढून टाकण्याचा निर्णय विभागीय आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत झाला. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्याची शक्यता आहे. तसेच स्त्यावर साचणाऱ्या पाण्याबाबत उपाययोजना करण्याचा निर्णयही बैठकीत झाला.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.