Chakan : होर्डिंगचे कापड अडकले थेट वीज वाहिन्यांच्या खांबावर, ४६ हजार ग्राहकांची बत्ती गुल

चाकण शहर व परिसरात गुरुवारी (दि. १) सायंकाळी वादळासह मुसळधार पूर्वमोसमी पाऊस झाला. या वादळात विविध ठिकाणी लावलेल्या मोठमोठ्या होर्डिंग्जचे फ्लेक्स महावितरणच्या अनेक वीजवाहिन्यांवर पडल्याने चाकण शहर व एमआयडीसी परिसरातील सुमारे ४६ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाल्याचे दिसून आले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Fri, 2 Jun 2023
  • 03:07 pm
Chakan : होर्डिंगचे कापड अडकले थेट वीज वाहिन्यांच्या खांबावर, ४६ हजार ग्राहकांची बत्ती गुल

चाकणकरमधील ४६ हजार ग्राहकांची बत्ती गुल

मुसळधार पावसामुळे ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित

चाकण शहर व परिसरात गुरुवारी (दि. १) सायंकाळी वादळासह मुसळधार पूर्वमोसमी पाऊस झाला. या वादळात विविध ठिकाणी लावलेल्या मोठमोठ्या होर्डिंग्जचे फ्लेक्स महावितरणच्या अनेक वीजवाहिन्यांवर पडल्याने चाकण शहर व एमआयडीसी परिसरातील सुमारे ४६ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाल्याचे दिसून आले आहे.

विशेष म्हणजे यातील ९० टक्के ग्राहकांचा वीजपुरवठा केवळ होर्डिंग्जच्या फ्लेक्समुळे तर उर्वरित १० टक्के वीजपुरवठा मोठी झाडे व फांद्या यंत्रणेवर पडल्यामुळे खंडित झाल्याचे निदर्शनास आले. सायंकाळनंतर महावितरणकडून वीज यंत्रणेवरील फ्लेक्स काढणे व वीजतारांची दुरुस्ती करण्याचे काम अविश्रांत सुरू होते.

शुक्रवारी (दि. २) पहाटे तीन वाजेपर्यंत टप्प्याटप्प्याने सर्वच ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. मात्र वादळामुळे उडालेले फ्लेक्स वीजवाहिन्यांच्या तारांवर पडल्याने चाकणमधील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांना खंडित वीजपुरवठ्याचा फटका बसला.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest