पिंपरी-चिंचवड: नवरात्र उत्सव शांततेत, आनंदात पार पाडावा; पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांचे नागरिकांना आवाहन

आगामी नवरात्र उत्सव नागरिकांनी शांततेत व उत्साहात पार पाडावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्‍त विनयकुमार चौबे यांनी केले आहे. शहरातील सर्व पोलीस ठाण्‍यांच्‍या प्रमुखांची बैठक त्‍यांनी घेतली. यावेळी त्‍यांनी पोलिसांना नवरात्र उत्‍सवात काय काळजी घ्‍यावी, याबाबतच्या सूचना केल्‍या आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Wed, 2 Oct 2024
  • 04:05 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

पिंपरी-चिंचवड: नवरात्र उत्सव शांततेत, आनंदात पार पाडावा; पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांचे नागरिकांना आवाहन

आगामी नवरात्र उत्सव नागरिकांनी शांततेत व उत्साहात पार पाडावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्‍त विनयकुमार चौबे यांनी केले आहे. शहरातील सर्व पोलीस ठाण्‍यांच्‍या प्रमुखांची बैठक त्‍यांनी घेतली. यावेळी त्‍यांनी पोलिसांना नवरात्र उत्‍सवात काय काळजी घ्‍यावी, याबाबतच्या सूचना केल्‍या आहेत.

शहरातील तीन पोलीस उपायुक्‍त कार्यालयांना पोलीस आयुक्‍त चौबे यांनी भेट दिली. यावेळी गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, विशाल गायकवाड, स्वप्ना गोरे, डॉ. शिवाजी पवार, साहाय्यक आयुक्त सचिन हिरे, मुगुटराव पाटील, राजेद्रसिंह गौर, सर्व पोलीस ठाण्‍यांचे वरिष्‍ठ पोलीस निरीक्षक उपस्थित होते.

यावेळी पोलीस आयुक्‍त विनयकुमार चौबे म्‍हणाले की, नवरात्र उत्सवामध्ये दांडिया खेळणाऱ्या ठिकाणी व आजूबाजूच्या परिसरात आवश्यक तो बंदोबस्त ठेवण्‍यात यावा. आवश्‍यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत. दांडिया, गरबा खेळणाऱ्या ठिकाणी व इतरत्र महिला व लहान मुलींची छेडछाड होणार नाही याबाबत दक्षता घ्‍यावी.

मंडळांनी देवीची मूर्ती तसेच दांडिया, गरबा खेळण्‍याच्‍या ठिकाणी स्वयंसेवक नेमावेत. मोकळी मैदाने, सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणांवर पेट्रोलिंग वाहने, बीट मार्शल्स तसेच गुन्‍हे शोधपथकांमार्फत गस्‍त घालावी.

आयुक्‍त पुढे म्‍हणाले की, देवीचा मिरवणूक मार्ग, दुर्गा दौड मार्गांची तपासणी करावी. तसेच मोकाट जनावरांचा बंदोबस्‍त करावा. दररोज गर्दीच्या ठिकाणी पोलीस स्टेशन तसेच गुन्हे शाखेतील अधिकारी पायी गस्‍त घालतील. तसेच नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे.

Share this story

Latest