गौतमी पाटील
पिंपरी चिंचवडमधील कासारवाडी येथील युवा कार्यकर्ते अमित शंकर लांडे यांचा सोमवारी (दि. २२) वाढदिवस होता. यानिमित्त त्यांनी नृत्यांगना गौतमी पाटीलच्या डान्सचा कार्यक्रमाचे जाहीर आयोजन करण्यात आले होते. मात्र, कार्यक्रम संपल्यानंतर आयोजकावर म्हणजेच बर्थडे बॉयवर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परवानगी नसतानाही कार्यक्रमाचे आयोजन केल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
युवा कार्यकर्ते अमित शंकर लांडे यांचा सोमवारी वाढदिवस होता. वाढदिवसाच्या निमित्ताने गौतमी पाटीलच्या डान्सचा कार्यक्रमाचे आय़ोजन करण्यात आले होते. अमित लांडे यांनी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमानिमित्त पोलिसांकडे रीतसर परवानगी मागितली होती. परंतु, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून भोसरी पोलिसांनी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमासाठीची परवानगी नाकारली.
पोलीसांनी परवानगी नाकारली असताना देखील आयोजक अमित लांडे यांनी सोमवारी गौतमी पाटीलचा जाहीर कार्यक्रम घेतला. तिने काही गाण्यांवर नृत्य करत उपस्थितांची मने जिंकली. मात्र, कार्यक्रमानंतर पोलिस कर्मचारी दत्तात्रेय बाळासाहेब कांबळे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार परवानगी नसताना कार्यक्रमाचे आयोजन केल्यामुळे थेट आयोजक असलेल्या बिर्थडे बॉयवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या भोसरी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.