संग्रहित छायाचित्र
पिंपरी चिंचवड शहर पोलीस (Pimpri Chinchwad City Police) दलातील सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत नेमणूक करण्यात आल्या आहेत.राज्यातील पोलीस निरीक्षकांच्या पदोन्नती झाल्यानंतर शहरात आलेल्या सहाय्यक आयुक्तांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये वाहतूक विभागासाठी दोन सहाय्यक आयुक्त देण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश शुक्रवारी (३ नोव्हेंबर) रात्री पोलीस आयुक्तांनी दिले.
सहाय्यक पोलीस आयुक्त भास्कर डेरे यांच्याकडे प्रशासन विभागाची जबाबदारी होती. त्यांची नेमणूक वाहतूक शाखेत करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत पिंपरी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश कसबे यांची देखील वाहतूक शाखेत नेमणूक करण्यात आली आहे. तर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल कुबडे यांची सहाय्यक पोलीस आयुक्त पिंपरी विभाग येथे नेमणूक झाली आहे.
पदोन्नती झाल्यानंतर नव्याने शहरात दाखल झालेले मुकुट लाल पाटील यांच्याकडे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशासन या पदाची जबाबदारी देण्यात आली आहे तर सहायक पोलीस आयुक्त डॉ. विवेक मुगळीकर यांच्याकडे भोसरी एमआयडीसी विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.