Train Accident : रेल्वेत घातपाताचा प्रयत्न फसला, यंत्रणांकडून चौकशी सुरू
पुणे : आकुर्डी ते चिंचवड दरम्यानच्या रेल्वे रुळांवर दगड रचून घातपात घडविण्याचा प्रयत्न जागरूक कर्मचाऱ्यांमुळे उघडकिस आला. रेल्वे गार्डसह खबऱ्यांनी दिलेल्या माहितीमुळे तात्काळ या ठिकाणी यंत्रणा दाखल झाल्या आणि हे सर्व दगड हटविण्यात आले. अन्यथा रेल्वेचा मोठा अपघात घडून प्रवाशांना धोका निर्माण झाला असता.
या घटनेमागे कोण आहे किंवा त्यांचा उद्देश काय होता याची माहिती रेल्वे इंटेलिजन्सकडून घेतली जात आहे. तसेच रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) सुद्धा या संदर्भात तपास करीत आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी चार ते साडेचार वाजण्याच्या दरम्यान उघडकीस आली. रेल्वे रुळांवर दगड रुचून ठेवल्याची माहिती रेल्वे कंट्रोल रूमला मिळाली होती. त्यानुसार पुढील कार्यवाही तात्काळ करण्यात आली. रेल्वे गाड्यांच्या पिक अवर मध्येच हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.