संग्रहित छायाचित्र
आळंदी: जवळ असलेल्या सोळू गावात एल्युमिनियम प्लेट बनवणाऱ्या पण बंद असलेल्या कंपनीत ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी भीषण स्फोट झाला होता. या स्फोटात आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला असून जखमी १७ जण रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. (Alandi Factory Explosion News)
काही जखमी व्यक्तींना ससून रुग्णालयात तर काहींना दोन खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कंपनी बंद असल्याने या घटनेत मृत्यू झालेले आणि जखमी हे रस्त्यावरून जात असताना त्यांना आगीची धग बसल्याने ही भीषण घटना घडली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.