बसथांब्याजवळ 'ठाण' मांडणाऱ्या १ हजार ६२० रिक्षाचालकांवर कारवाई; पीएमपीएमएल आणि आरटीओ पथकाची संयुक्त कारवाई

पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील बसस्थानके किंवा थांब्याजवळ थांबणाऱ्या एक हजार ६२० रिक्षांवर कारवाई करण्यात आली. पीएमपीएमएल आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) पथकाने संयुक्त कारवाई करीत तीन महिन्यांत दंडात्मक कारवाई केली आहे.

बसथांब्याजवळ 'ठाण' मांडणाऱ्या १ हजार ६२० रिक्षाचालकांवर कारवाई

बसथांब्यांपासून ५० मीटर अंतरावर संमती नसतानाही मारतात ताबा

पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील बसस्थानके किंवा थांब्याजवळ थांबणाऱ्या एक हजार ६२० रिक्षांवर कारवाई करण्यात आली. पीएमपीएमएल (PMPML) आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) पथकाने संयुक्त कारवाई करीत तीन महिन्यांत दंडात्मक कारवाई केली आहे.

‘पीएमपी’ची बसस्थानके किंवा बसथांब्यांपासून ५० मीटर अंतरावर रिक्षाचालकांना रिक्षा थांबवता येत नाही, असा नियम आहे. परंतु रिक्षाचालक त्या नियमाकडे दुर्लक्ष करून सर्रास बसस्थानकांच्या परिसरात येऊन बसप्रवाशांची वाहतूक करतात. अनेक रिक्षाचालक या थांब्यापाशी आपले ठाण मांडून बसलेले असतात. तर, अनेक रिक्षाचालक बसथांब्यापासून काही अंतरावर उभे असलेले प्रवासी नेतात. त्याचप्रमाणे बसचालकांना अडथळ होईल अशाप्रकारे रिक्षा उभ्या करतात, अशा तक्रारी ‘पीएमपीएमएल’चे चालक, प्रवासी आणि प्रवासी मंच या संघटनेकडून प्रशानाकडे सातत्याने करण्यात आल्या होत्या. त्याची दखल घेऊन दोन स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत. त्यात ‘पीएमपी’चे चार कर्मचारी आणि एक आरटीओ अधिकारी यांचा समावेश आहे. त्यांनी तीन महिन्यांत पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील ‘पीएमपीएमएल’च्या मुख्य बसस्थानकांच्या ५० मीटरच्या परिसरात येऊन नियम मोडणाऱ्या एकूण १,६२० रिक्षाचालकांवर कारवाई केली आहे, अशी माहिती ‘पीएमपी’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय कोलते यांनी दिली.

तसेच स्वारगेट बसस्थानकाच्या परिसरात वाहतुकीस अडथळा करणाऱ्या रिक्षा, ओला, उबेर, लक्झरी बस आदी वाहनांवर मोटार वाहन कायदा १९८८ नुसार एक जानेवारी ते २५ मार्चअखेर ५३० वाहनांवर कारवाई करून वाहतुकीस अडथळा केल्याबद्दल त्यांच्याकडून एकूण रक्कम ३ लाख ३३ हजार रुपये दंड वसूल करण्यात आल्याचे ‘पीएमपीएमएल’चे वाहतूक व्यवस्थापक सतीश गव्हाणे यांनी सांगितले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest