संग्रहित छायाचित्र
पीएमपी बसने प्रवासात आत्ता पर्यंत दागिने, मोबाईल, पैशांचे पाकिट चोरीला जात होते. मात्र,आता चोरट्यांनी एका महिलेचा लॅपटॉप आणि इतर साहित्य चोरून नेले आहे. सोमवारी (४ डिसेंबर) सकाळी पुणे मनपा ते थेरगाव या मार्गावर ही घटना घडली. याप्रकरणी महिलेने अज्ञाताच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला सोमवारी सकाळी साडेदहा वाजता पुणे मनपा येथून लक्ष्मणनगर थेरगाव येथे जाण्यासाठी निघाल्या. त्या सकाळी सव्वा अकरा वाजता लक्ष्मणनगर, थेरगाव येथे पोहोचल्या. बसमधून उतरताना त्यांचा लॅपटॉप आणि इतर साहित्य चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. बसमधून प्रवास करताना अज्ञात चोरट्याने या महिलेचा लॅपटॉप, चार्जर, माउस, एअरटेल कंपनीचे डेटाकार्ड असा एकूण ४५ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.