संग्रहित छायाचित्र
पिंपरी : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर (Pune-Mumbai highway) भरधाव दुचाकीने एका पिकपला धडक (Accident News) दिली. त्यात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर दुचाकीवरील सहप्रवासी गंभीर जखमी झाला. हा अपघात गुरुवारी (२७ ऑक्टोबर) मध्यरात्री पावणे (Pimpri Chinchwad) एक वाजताच्या सुमारास तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) येथे एबीसी पंपाजवळ घडला.
अर्जुन राजेश विश्वकर्मा (वय १९, रा. बोरीवली पूर्व, मुंबई) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वराचे नाव आहे. तर सोहन पेटाडे असे जखमी तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जुन विश्वकर्मा हा दुचाकीवरून मुंबईकडून पुण्याच्या दिशेने येत होता. तळेगाव दाभाडे येथे एबीसी पंपाजवळ महामार्गावरून मंत्रा सिटीकडे जाण्यासाठी एक पिकप वळण घेत असताना अर्जुन याने त्याच्या दुचाकीने पिकपला जोरात धडक दिली. त्यात अर्जुन हा गंभीर जखमी होऊन मयत झाला. तर त्याच्या दुचाकीवरील सोहन पेटाडे हा गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात दुचाकी आणि पिकपचे मोठे नुकसान झाले आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.