पिंपरी-चिंचवड शहरातील रिक्षा बनलीय चर्चेचा विषय;उन्हाळ्यात सुखद गारवा देणारी 'झाड'वाली रिक्षा

उन्हाळ्यात शरीराला गारवा मिळावा म्हणून बरेचजण काही ना काही उपाययोजना करताना दिसतात, शहरातील स्त्यांवरून फिरणारी एक रिक्षा (Rickshaw) सध्या चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय बनला आहे.

Pimpri Chinchwad Riksha

पिंपरी-चिंचवड शहरातील रिक्षा बनलीय चर्चेचा विषय;उन्हाळ्यात सुखद गारवा देणारी 'झाड'वाली रिक्षा

रिक्षामध्ये बसवल्या आहेत देशी-विदेशी झाडांच्या कुंड्या

उन्हाळ्यात शरीराला गारवा मिळावा म्हणून बरेचजण काही ना काही उपाययोजना करताना दिसतात, शहरातील स्त्यांवरून फिरणारी एक रिक्षा (Rickshaw) सध्या चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय बनला आहे. ऐन उन्हाळ्यात प्रवाशांना सुखद गारवा देत ही रिक्षा रस्त्यांवरून धावताना दिसत आहे. पिंपरीत राहणाऱ्या गणेश नानेकर यांची ही अनोखी रिक्षा असून त्यांची प्रवाशांच्या गारवा मिळावा म्हणून पुर्ण रिक्षात देशी-विदेशी झाडांच्या कुंड्या बसवण्यात आल्या आहेत. (Pimpri Chinchwad Riksha) 

वृक्ष लागवडीची आवड असणारे नानेकर पोटच्या मुलाप्रमाणे झाडांची काळजी घेत आहेत. दिवसातून तीन वेळा पाणी, आठवड्यातून दोनदा खत देतात. रिक्षामध्ये बसणारे प्रवासी कुतूहलाने या रिक्षाचे फोटो, व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत. नानेकर यांनी २५ पेक्षा अधिक कुंड्या रिक्षामध्ये बसवल्या आहेत. या अनोख्या रिक्षाला ‘झाडवाली रिक्षा’ म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. नानेकर यांनी या रिक्षामध्ये इंटिरियर सुरेख केले आहे.

रिक्षामधील देशी - विदेशी झाडांच्या कुंड्यामुळे प्रवाशांना प्रवास करताना उन्हाळ्यात सुखद गारवा मिळू लागला आहे. रिक्षातील कुंड्यामध्ये झाडांना वेळेवर पाणी, खत घालून त्यांची योग्य काळजी, निगा राखत आहे.

रिक्षातील स्वच्छता, हवेचा गारवा, झाडांमुळे मिळणारा प्रसन्न त्यामुळे प्रवासी देखील नानेकर यांचे कौतूक करत आहेत. त्यामुळे नानेकर यांच्या सोबत रिक्षात बसणारे प्रवासी कुतूहलाने या रिक्षाचे फोटो, सेल्फी, व्हीडीओ काढून सध्या सोशल मीडियावर व्हायरल करत आहे. नानेकर यांच्या अनोख्या रिक्षाला झाडवाली रिक्षा म्हणून ही शहरात नव्याने ओळखले जाऊ लागले आहे.

आम्हा पती-पत्नीला झाडे लावण्याची आवड आहे. दोन-तीन वर्षांपूर्वी रिक्षामध्ये बाटलीत मनी प्लांट लावला होता. तो पाहून नागरिक उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत कौतुक करत होते. त्यामुळे रिक्षात झाडे का लावू नयेत, असे वाटले. त्यानुसार रिक्षात कुठली झाडे जगतील, याचा अभ्यास केला. वृक्ष अभ्यासकांनी सांगितल्याप्रमाणे झाडे लावली.

- गणेश नाणेकर, रिक्षाचालक

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest