Accident : भरधाव डंपरची दुचाकीला धडक; महिलेचा मृत्यू, एकजण जखमी

भरधाव डंपरने एका दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला. तर दुचाकी चालक गंभीर जखमी झाला. ही घटना गुरुवारी (दि. 30) सकाळी म्हाळुंगे येथे घडली.

Accident : भरधाव डंपरची दुचाकीला धडक; महिलेचा मृत्यू, एकजण जखमी

संग्रहित छायाचित्र

भरधाव डंपरने एका दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला. तर दुचाकी चालक गंभीर जखमी झाला. ही घटना गुरुवारी (दि. 30) सकाळी म्हाळुंगे येथे घडली.

प्रमिला उर्फ संगीता चांगदेव ठाकर असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. बाळू भाऊ भोसले (वय 68, रा. माणगाव, ता. मुळशी) हे जखमी झाले आहेत. त्यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार डंपर (एमएच 14/केक्यू 7281) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भोसले आणि प्रमिला ठाकर हे दोघेजण गुरुवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास म्हाळुंगे गावातून दुचाकीवरून जात होते. त्यावेळी त्यांच्या पाठीमागून आलेल्या भरधाव डंपरने भोसले यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. त्यामध्ये प्रमिला दुचाकीवरून खाली पडल्या. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. तर भोसले हे देखील गंभीर जखमी झाले आहेत. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest