मल्हार अन् गुलाबच्या खांद्यावर तुकोबांचा पालखी रथ

श्री संतश्रेष्ठ तुकाराम ३३९ व्या पालखी सोहळ्यासाठी देहू ते पंढरपूर व पंढरपूर ते देहू दरम्यानचा पालखी रथ ओढण्याची व सेवा करण्याची संधी लोहगावच्या सुरज खांदवे यांच्या हिरा व राजा आणि नांदेड गावच्या निखिल कोरडे यांच्या मल्हार व गुलाब या बैलजोडीला मिळाली आहे, तर चौघडा गाडी ओढण्याचा माण टाळगाव चिखलीच्या बाळासाहेब मळेकर यांच्या नंद्या व संद्या जोडी मिळाला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Fri, 7 Jun 2024
  • 12:57 pm
Tukaram maharaj Palkhi

मल्हार अन् गुलाबच्या खांद्यावर तुकोबांचा पालखी रथ

संत तुकाराम महाराज ३३९ व्या पालखी सोहळ्याचे २८ जूनला प्रस्थान

श्री संतश्रेष्ठ तुकाराम ३३९ व्या पालखी सोहळ्यासाठी देहू ते पंढरपूर व पंढरपूर ते देहू दरम्यानचा पालखी रथ ओढण्याची व सेवा करण्याची संधी लोहगावच्या सुरज खांदवे यांच्या हिरा व राजा आणि नांदेड गावच्या निखिल कोरडे यांच्या मल्हार व गुलाब या बैलजोडीला मिळाली आहे, तर चौघडा गाडी ओढण्याचा माण टाळगाव चिखलीच्या बाळासाहेब मळेकर यांच्या नंद्या व संद्या जोडी मिळाला आहे.

श्री संत तुकाराम महाराज ३३९ व्या पालखी सोहळ्याचे येत्या २८ जूनला श्रीक्षेत्र देहगाव येथून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. त्यानुसार देहू देवस्थान संस्थानने पालखी रथ आणि चौघडा गाडीस बैलजोडी जोडण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार जिल्ह्यातून २६ बैलजोडी मालकांनी अर्ज केले होते. शारीरिक व वैद्यकीयदृष्ट्या भक्कम अशा बैलजोडीतून २ बैल जोड्या पालखी रथासाठी व एक बैलजोडी चौघडा गाडीसाठी शोधण्यात आली. देहू देवस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, पालखी सोहळाप्रमुख माणिक महाराज मोरे, विशाल महाराज मोरे, अजित महाराज मोरे, विश्वस्त संजय महाराज मोरे, संतोष महाराज मोरे यांनी सर्व बैलजोड्यांची पाहणी केली.

संत तुकाराम महाराज पालखी रथासाठी सुरज ज्ञानेश्वर खांदवे, हभप निखिल सुरेश कोरडे यांच्या बैलजोडीची निवड केली. तर, चौघडा गाडीसाठी टाळगाव चिखली बाळासाहेब सोपान मळेकर यांच्या बैलजोडीची निवड केली. सुरज ज्ञानेश्वर खांदवे हे श्री संत तुकाराम महाराजांचे आजोळ असलेले लोहगाव ता. हवेली. पुणे येथील शेतकरी असून त्यांच्या बैलजोडीचे नाव हिरा व राजा आहे. त्याचप्रमाणे नांदेड गाव ता. हवेली, पुणे येथील निखिल सुरेश कोरडे हेही शेतकरी असून त्यांनीही आपल्या मल्हार- गुलाब बैलजोडीला पालखी सोहळ्यासाठी संधी मिळाली आहे.

नंद्या, संद्याला मानपालखी रथाच्या पुढे असलेल्या चौघडा गाडी ओढण्यासाठी चिखली टाळगाव या ऐतिहासिक गावातील प्रगतशील शेतकरी व उद्योजक बाळासाहेब सोपान मळेकर यांच्या नंद्या व संद्या बैलजोडीला मान देण्यात आला, अशी माहिती विशाल महाराज मोरे यांनी दिली.

संत तुकाराम महाराज पालखी रथास आपली बैलजोडी जोडून संत तुकोबांची सेवा करण्याची संधी मिळावी, ही अनेक वर्षांपासून खूप इच्छा होती. त्यासाठी सात ते आठ वेळा अर्जही केले होते. यावर्षी तुकोबारायांची सेवा करण्याची संधी मिळाली. त्यामुळे आमच्या कुटुंबाचे सार्थक झाले आहे.

- हभप निखिल सुरेश कोरडे

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest