ऑटोमोबाईल स्पेअर पार्ट बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; सुमारे एक कोटींचे नुकसान

आगीत कंपनीतील साहित्य जळून खाक झाले असून यामध्ये सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. सुमारे ६५ जवानांनी ही आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Fri, 15 Sep 2023
  • 04:38 pm
major fire : ऑटोमोबाईल स्पेअर पार्ट बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; सुमारे एक कोटींचे नुकसान

ऑटोमोबाईल स्पेअर पार्ट बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; सुमारे एक कोटींचे नुकसान

पिंपरी चिंचवडमधील वाल्हेकरवाडी येथील ऑटोमोबाईल स्पेअर पार्ट बनवणाऱ्या कंपनीला आग लागली. गुरुवारी (दि. १४) रात्री उशिरा ही घडली. या आगीत कंपनीतील साहित्य जळून खाक झाले असून यामध्ये सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. सुमारे ६५ जवानांनी ही आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, काटे मळा चिंचवडेनगर, वाल्हेकरवाडी येथे एका कंपनीला आग लागल्याची वर्दी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास पिंपरी-चिंचवड अग्निशमन विभागाला मिळाली. आग मोठ्या स्वरुपात असल्याचे समजल्याने प्राधिकरण, पिंपरी, रहाटणी, थेरगाव, चिखली, भोसरी, तळवडे, बजाज ऑटो आकुर्डी, एमआयडीसी हिंजवडी फेज एक, पीएमआरडीए मारुंजी, टाटा मोटर्स इत्यादी ठिकाणावरून अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले.

काही तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. जेसीबीच्या सहाय्याने गोडाऊन मधील मटेरियल बाजूला करून कुलिंग करत आग पूर्णपणे विझवण्यात आली. गोडाऊन मधील ऑटोमोबाईल स्पेअर पार्ट, लोखंडी मटेरियल, प्लास्टिक मटेरियल, रबर, लाकडी रॅक, संगणक, लॅपटॉप, प्रिंटर, इलेक्ट्रिक वायर, बोर्ड, पत्रे आदि साहित्य जळून सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest