पूर्णानगरमध्ये अग्नितांडव, एकाच कुटूंबातील चौघांचा होरपळून मृत्यू
पिंपरी चिंचवडमधील पूर्णानगर येथे एका हार्डवेअरच्या दुकानाला आग भीषण आग लागली आहे. या आगीत एकाच कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. ही आग आज पहाटे ५ वाजताच्या सुमारास लागली आहे. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही.
चिमणाराम चौधरी (वय ४५), ज्ञानुदेवी चौधरी (वय ४०), भावेश चौधरी (वय १५) आणि एक १० वर्षाचा मुलागा अशी आगीत होरपळून मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे पुर्णानगर येथील सचिन हार्डवेअर या दुकानाला आग लागली.
मात्र, पाहता पाहता आगीने रौद्र रुप धारण केले. त्यामुळे याच हार्डवेअरच्या दुकानात वास्तव्यास असलेले चौधरी कुटुंब होरपळले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखळ झाल्या आहेत. सध्या आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.