Pimpri Chinchwad: इंद्रायणी नदीपात्रात बांधले २७ बंगले

महापालिका हद्दीतील चिखली रिव्हर रेसिडेन्सी सोसायटीच्या पाठीमागील बाजूला इंद्रायणी नदी पात्रात आणि पूररेषेत तब्बल २७ बंगले उभारून त्या ठिकाणी नागरिकांचे वास्तव्य सुरू झाले आहे.

संग्रहित छायाचित्र

अनधिकृत बांधकाम अधिकाऱ्यासह 'क' क्षेत्रीय अधिकाऱ्यांचा 'काणा' डोळा, अनधिकृत बांधकामावर कारवाई न करण्यामागे अर्थकारण?

विकास शिंदे
महापालिका हद्दीतील चिखली रिव्हर रेसिडेन्सी सोसायटीच्या पाठीमागील बाजूला इंद्रायणी नदी (Indrayani River) पात्रात आणि पूररेषेत तब्बल २७ बंगले उभारून त्या ठिकाणी नागरिकांचे वास्तव्य सुरू झाले आहे. राजकीय नेत्यांचा आशीर्वाद आणि अनधिकृत बांधकाम अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक केलेल्या दुर्लक्षामुळे नागरिकांनी घरे बांधली आहेत. मात्र, संबंधित स्थानिक जागामालकांनी नागरिकांची फसवणूक करत जागा विकल्याचे नागरिक बोलत आहेत. त्यामुळे नागरिकांनी जागा खरेदी करून घरे बांधली आहेत. त्यामुळे घरे बांधणा-या नागरिकांचे आता 'ना घर का, ना घाट का?, अशी अवस्था झाली आहे.

चिखली येथील रिव्हर रेसिडेन्सी सोसायटीच्या (River Residency Society Chikhli) जवळ इंद्रायणी नदीपात्रात तसेच पूररेषेच्या जागेतच स्थानिक राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने अनधिकृत प्लॉटिंग करण्यात आले होते. सदरची जागा ग्रीन झोन असल्याचे सांगून स्थानिकांकडून लाखो रुपयाला प्लाॅटची विक्री करत नागरिकांची फसवणूक करण्यात आलेली आहे. राजकीय पदाधिका-यांच्या आशीर्वादाने सदर प्लाॅट विक्री झाल्याने याकडे महापालिकेच्या क क्षेत्रीय कार्यालयासह अनधिकृत बांधकाम परवानगी विभागाचे दुर्लक्ष केले होते.    

महापालिका (PCMC) हद्दीत इंद्रायणीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात राडारोडा टाकून अनधिकृत विनापरवानगी बांधकामे, अतिक्रमण करण्याचे प्रकार वाढले आहेत. नदीपात्रालगत भराव टाकणे, राडारोडा टाकून प्लाॅटिंग होत आहे. पूररेषेत जागेचे ले - आऊट करून प्लाॅटिंग करत जागेची विक्री झालेली आहे. नदीपात्रात हे प्रकार होऊ लागल्याने भविष्यातील संभाव्य पूरपरिस्थिती उद्भवणार आहे.  चिखलीच्या रिव्हर रेसिडेन्सी सोसायटीशेजारी इंद्रायणी नदीपात्रालगत तसेच पूररेषेतच अर्धा, एक, दोन गुंठ्यांचे छोटे भूखंड नागरिकांकडून विकत घेतले, त्यानंतर जागेवर अनधिकृत बांधकामे करत तब्बल २७ बंगले तयार झाले आहेत. अजून त्या जागेत काही बांधकामे सुरू आहेत.

दरम्यान, स्थानिकांकडून जागा घेऊन नागरिकांची फसगत झालेली आहे. त्या जागेवर घरे विनापरवानगी घरे बांधण्यात आलेली आहे. काही ठिकाणी लोक वास्तव्यास आलेली आहे. मात्र, इंद्रायणी नदीत घरे बांधल्याने त्यांची हरित लवादाकडे तक्रार झाली असून त्यावर निर्णय होणे बाकी आहे. परंतु, महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम विभाग, क क्षेत्रीय कार्यालयाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने बांधकामे वाढतच चालली आहेत.

इंद्रायणी नदीपात्रात तब्बल २७ अनधिकृत बंगले बांधण्यात आलेली आहेत. त्या संदर्भात हरित लवादाकडे केस सुरू आहे. बांधकाम विभागाकडून परवानगी न घेता सर्व बांधकामे झालेली आहेत. काही बांधकामे नदीपात्रालगत आणि पूररेषेत झालेली आहेत. हरित लवादाकडे प्रतिज्ञापत्र देण्यात आलेले आहे. हरित लवादाकडून लवकरच आदेश येईल, त्यानंतर नदीत आणि पूररेषेत बांधलेली सर्व बांधकामे पाडावी लागणार आहे, अशी माहिती बांधकाम विभागातील एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.  

खोट्या जाहिराती करत नागरिकांची फसवणूक

चिखलीच्या रिव्हर रेसिडेन्सी, कोलूलस सोसायटी परिसरात इंद्रायणी नदीपात्रात अनेक ठिकाणी भराव टाकला जात आहे. पूररेषेत प्लाॅटिंग करण्यात आलेले आहे. रिव्हर सोसायटीनंतर पालिकेचा रस्ता आहे. त्या रस्त्यालगत पूररेषेची हद्द लागते. शंभर ते दोनशे मीटर अंतरावर नदीपात्रालगत प्लॉटिंग करण्यात आलेले आहे. ग्रीन झोन, एनए केलेले अशी जाहिरात करून एक, दोन गुंठ्यांचे भूखंड नागरिकांकडून विकत घेतलेले आहेत. त्यावर अनधिकृत बांधकामे करत घरे बांधली आहेत.

चिखली इंद्रायणी नदीपात्रात वेगवेगळी बांधकामे झालेली आहेत. ती सर्व बांधकामे अनधिकृत आहेत. त्या सर्व बांधकामांना यापूर्वीच नोटीस दिलेल्या आहेत. मात्र, हरित लवाद केस सुरू असल्याने त्यावर कारवाई केलेली नाही. एनजीटीच्या आदेशाने त्या बांधकामावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.

- आण्णा बोदडे, उपायुक्त, तथा 'क' क्षेत्रीय अधिकारी, महापालिका, पिंपरी-चिंचवड

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest