संग्रहित छायाचित्र
पिंपरी: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शाखेतर्फे पिंपरी चिंचवड कलारंग प्रतिष्ठान यांच्या सहयोगाने व सिद्धी विनायक ग्रुप पुरस्कृत 'आशा भोसले पुरस्कार' यंदा सुप्रसिध्द पार्श्वगायक, संगीतकार शान (शांतनू मुखर्जी) यांना जाहीर करण्यात आला आहे. सन्मान चिन्ह, १ लाख ११ हजार रुपये रोख, शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराचे यंदा २० वे वर्ष आहे. यंदाचा हा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम रविवार दि. ११ फेब्रुवारी २०२४ रोजी संध्याकाळी ५.३० वाजता कामगार कल्याण मैदान, भोईर नगर, चिंचवड येथे होणार आहे. (Latest News Pimpri)
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिं. चिं. शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर , नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे प्रमूख कार्यवाह सुहास जोशी, उपाध्यक्ष किरण येवलेकर, कोषाध्यक्ष राजेंद्र बंग, सदस्य नरेंद्र आणले यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
भाऊसाहेब भोईर म्हणाले, जेष्ठ संगीतकार पं. ह्रदयनाथ मंगेशकर यांची या पुरस्कार सोहळ्यास प्रमुख उपस्थिती असणार आहे. यावेळी शान यांच्या गीतांवर आधारित मधुमित निर्मित मधुसूदन ओझा प्रस्तुत “रजनीगंधा” हा कार्यक्रम देखील सादर होणार आहे.
पुरस्काराविषयी अधिक माहिती देताना भाऊसाहेब भोईर म्हणाले, गेल्या २४ वर्षांपासून जेष्ठ गायिका आशा भोसले यांच्या नावाने 'आशा भोसले पुरस्कार' दिला जातो. आज पर्यंत गानकोकिळा लता मंगेशकर, खय्याम, रविंद्र जैन, बप्पी लहरी, प्यारेलालजी, आनंदजी, हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, अनु मलिक, शंकर महादेवन, पंडित शिवकुमार शर्मा, सुरेश वाडकर, हरीहरन, सोनू निगम, सुनिधी चौहान, पद्मभूषण उदित नारायण, रुपकुमार राठोड, अवधूत गुप्ते आणि सलील कुलकर्णी आदींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.