रुपाली चाकणकरांविषयी अश्लील मजकूर; गुन्हा दाखल

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याविषयी समाजमाध्यमात अश्लील मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रुपाली चाकणकर यांनी समाजमाध्यमात मजकूर प्रसारित केला होता. त्या वेळी ॲड. विजयकुमार साखरे नावाच्या खातेधारकाने अश्लील भाषेत समाजमाध्यमात प्रतिक्रिया नोंदवली. साखरेनंतर अश्लील प्रतिक्रियेवर आणखी काही जणांनी प्रतिक्रिया नोंदवल्या.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Nitin Gangarde
  • Wed, 12 Jul 2023
  • 12:29 am

रुपाली चाकणकरांविषयी अश्लील मजकूर; गुन्हा दाखल

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याविषयी समाजमाध्यमात अश्लील मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रुपाली चाकणकर यांनी समाजमाध्यमात मजकूर प्रसारित केला होता. त्या वेळी ॲड. विजयकुमार साखरे नावाच्या खातेधारकाने अश्लील भाषेत समाजमाध्यमात प्रतिक्रिया नोंदवली. साखरेनंतर अश्लील प्रतिक्रियेवर आणखी काही जणांनी प्रतिक्रिया नोंदवल्या.

या प्रकरणी सात आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे. शिवाजीनगर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सिंहगड रोड पोलीस करत आहेत. याबाबत युवराज विलास चव्हाण (वय ३१, रा. धायरी) यांनी सायबर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे रुपाली चाकणकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात काम करतात. तसेच ते सोशल मीडियाचे कामकाज पाहतात. चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले की, ६ जुलै रोजी दुपारी २ ते ५ या वेळेत रुपाली चाकणकर या फेसबुकवर लाईव्ह करत असताना दोघांनी आक्षेपार्ह प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. सायबर पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. चाकणकर यांच्याविषयी समाजमाध्यमात अश्लील मजकूर प्रसारित करणाऱ्या खातेधारक, तसेच खात्याची तांत्रिक पडताळणी सुरू करण्यात आली आहे.  दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासोबत बंडखोरी केलेल्या आमदार आणि नेत्यांना आता टार्गेट केले जात आहे. या नेत्यांना धमक्यांचे फोन येत आहेत, तर काही महिला नेत्यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे नेते छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांना जिवे मारण्याच्या धमकीचे फोन आले आहेत. या प्रकरणीदेखील कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा भारतीय दंड विधान ५०६ दाखल करण्यात आला असून तपास सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलिमा पवार यांनी सांगितले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story