पालिकेत नोकरी देण्याच्या बहाण्याने अनेकांना फसवले

माजी कामगार राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्याशी ओळख असल्याचे सांगून महापालिकेत नोकरी देण्याचे आमिष दाखवून अनेकांना लाखो रुपयांना फसवल्याची घटना उघड झाली आहे. अशाच एका घटनेत मंगेश चिकने याला २ लाखास फसवले असून त्याने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी भास्कर लक्ष्मण मोहोळ याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Nitin Gangarde
  • Sat, 8 Jul 2023
  • 10:16 am
पालिकेत नोकरी देण्याच्या बहाण्याने अनेकांना फसवले

पालिकेत नोकरी देण्याच्या बहाण्याने अनेकांना फसवले

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

माजी कामगार राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्याशी ओळख असल्याचे सांगून महापालिकेत नोकरी देण्याचे आमिष दाखवून अनेकांना लाखो रुपयांना फसवल्याची घटना उघड झाली आहे. अशाच एका घटनेत मंगेश चिकने याला २ लाखास फसवले असून त्याने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी भास्कर लक्ष्मण मोहोळ याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

हा प्रकार जून २०१९ ते नोव्हेबर २०२१ दरम्यान घडला. फिर्यादी एका सीएच्या फर्ममध्ये व्यवस्थापक म्हणून कामास होते. भास्कर मोहोळ हा सरकारी नोकरी मिळवून देतो असे त्यांना मित्रांनी जून २०१९ मध्ये सांगितले. मोहोळशी भेट झाल्यावर कामगार राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्याशी बोललो आहे. तुम्हाला महापालिकेत नोकरी देतो, त्यासाठी ५ लाख रुपये लागतील. त्यातील ४ लाख आधी आणि शिल्लक १ लाख काम झाल्यावर द्यावे लागतील, असे त्याने सांगितले. पैसै दिल्यानंतर १५ दिवसात काम होईल असेही त्याने सांगितले. फिर्यादीने मोहोळला २ लाख २० हजार दिले.

नंतर नोकरीबाबत आरोपीला फोन केल्यावर काम होईल थोडे थांबा असे तो सांगत होता. मोहोळ याच्याशी ओळख करून देणाऱ्या मित्रांनाही त्याने फसवल्याचे चौकशीत आढळले. त्या मित्रांची नावे कोरे आणि रणधीर अशी होती. त्यांनीही प्रत्येकी ४ लाख रुपये दिले होते. पैसे थोड्या दिवसांत देतो असे आश्वासन मोहोळ देत असे. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story