कुंडी सोशल मीडियावर, प्रशासन रस्त्यावर

एखाद्या प्रश्नाकडे पुणे महापालिकेचे प्रशासन कशा पद्धतीने दुर्लक्ष करते आणि अंगाशी येत आल्याचे पाहून कशी धावपळ करते याचे आणखी एक उदाहरण पाहावयास मिळाले ते खुद्द पुण्याच्या प्रभात रस्त्यावर. या रस्त्याचे नुकतेच डांबरीकरण झाले असून तेथील भूमिगत गटारीचे झाकण हे रस्त्याची पातळी सोडून खाली गेले होते.

कुंडी सोशल मीडियावर, प्रशासन रस्त्यावर

कुंडी सोशल मीडियावर, प्रशासन रस्त्यावर

प्रभात रस्त्यावर खचलेल्या गटारीच्या झाकणावरील कुंडी झळकली मीडियावर अन् प्रशासन लागले कामाला

 प्रिन्स चौधरी

feedback@civicmirror.in

एखाद्या प्रश्नाकडे पुणे महापालिकेचे प्रशासन कशा पद्धतीने दुर्लक्ष करते आणि अंगाशी येत आल्याचे पाहून कशी धावपळ करते याचे आणखी एक उदाहरण पाहावयास मिळाले ते खुद्द पुण्याच्या प्रभात रस्त्यावर. या रस्त्याचे नुकतेच डांबरीकरण झाले असून तेथील भूमिगत गटारीचे झाकण हे रस्त्याची पातळी सोडून खाली गेले होते. यामुळे तेथून जाणाऱ्या दुचाकीचालकांचा अपघात होण्याची शक्यता अधिक होती. अपघात टाळण्यासाठी दक्ष नागरिकांनी खाली गेलेल्या गटारीच्या झाकणावर फुलांची कुंडी ठेवली होती. त्याचा उद्देश एवढाच होता की तेथून जाणाऱ्या वाहनचालकांचे तेथे लक्ष जावे आणि अपघात टळावा. मात्र, भररस्त्यात ठेवलेली फुलांची कुंडी येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या दृष्टीने अडचणीची ठरत होती.      

विशेष म्हणजे एवढे होईपर्यंत प्रशासनाचे यांच्याकडे काही लक्ष नव्हते. सोशल मीडियावर या फुलाच्या कुंडीवर अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या आणि मग प्रशासनाला जाग आली. पालिका प्रशासनाने तातडीने ही फुलाची कुंडी हलवली आणि गटारीच्या झाकणाची आणि रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात आली. झाकण आणि रस्ता एका पातळीत आणण्यासाठी आवश्यक डांबरीकरण आणि काँक्रिटीकरण करण्यात आले. 

कमला नेहरू पार्क जवळ राहणारे अक्षय दामले ‘सीविक मिरर’शी बोलताना म्हणाले की, फेब्रुवारी आणि मार्चच्या काळात पुणे पालिकेने येथील भूमिगत गटारीचे काम केले होते. पालिकेला येथे काँक्रिटचा रस्ता करायचा होता. मात्र, नागरिकांनी त्याला विरोध केला. काँक्रिटच्या रस्त्यांमुळे पाण्याचा निचरा होणार नाही आणि तो जमिनीत उतरला नाही तर रस्त्यावर पाणी मोठ्या प्रमाणावर साचेल. स्थानिक आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी हस्तक्षेप केल्यावर पालिकेने अखेर येथे डांबरी रस्ता केला. याच रस्त्याचे काम मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण झाले. रस्त्याचे डांबरीकरण करताना गटारीचे झाकण पूर्णपणे झाकले गेले होते. नागरिकांनी हा प्रश्न उपस्थित केल्यावर कंत्राटदाराने झाकणावरील डांबर दोन आठवड्यांपूर्वी काढून टाकले. मात्र, या रस्त्यावर वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे की काही दिवसात हे झाकण दबले गेले. हा विषय अनेकांनी सोशल मीडियावर मांडला होता. याच काळात शिरोळे यांनी या प्रश्नाकडे लक्ष दिल्यामुळे कंत्राटदाराने तातडीने दुरुस्ती केली. झाकण आणि रस्त्याची पातळी एक करण्याबरोबर सिंमेटीकरणही करण्यात आले.     

आमदार सिद्धार्थ शिरोळे ‘सीविक मिरर’शी बोलताना म्हणाले की, पुणे महापालिकेने भूमिगत गटारीचे काम समाधानकारक पद्धतीने केले नाही. पालिकेचे अधिकारी, कंत्राटदारांना या कामाच्या दर्जाबाबत मी कल्पना दिली आहे. तसेच अशा प्रकारचे खालच्या दर्जाचे काम सहन केले जाणार नाही असेही त्यांना बजावले आहे. तसेच रस्त्यावरील काही अखेरची कामेही पूर्ण झालेली नाहीत. यामुळे कंत्राटदार आणि पालिका अधिकाऱ्यांना ही कामे समाधानकारक पद्धतीने आणि लवकरात सवकर पूर्ण करण्यास सांगितले आहे.     

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story