‘तू माझी नाही तर, कोणाचीच नाहीस’

एकतर्फी प्रेमातून २६ वर्षीय तरुणाने ३७ वर्षीय महिलेवर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. ही महिला तरुणापेक्षा १० वर्षाने मोठी आहे. त्यांच्यावर एकतर्फी प्रेम करणार्‍याने तू मला भेटत का नाही. माझे तुझ्यावर प्रेम आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Nitin Gangarde
  • Fri, 14 Jul 2023
  • 12:24 am
‘तू माझी नाही तर, कोणाचीच नाहीस’

‘तू माझी नाही तर, कोणाचीच नाहीस’

एकतर्फी प्रेमातून महिलेवर दांडक्याने केला कोरेगाव पार्कमध्ये प्राणघातक हल्ला, आरोपीस अटक

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

एकतर्फी प्रेमातून २६ वर्षीय तरुणाने ३७ वर्षीय महिलेवर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. ही महिला तरुणापेक्षा १० वर्षाने मोठी आहे. त्यांच्यावर एकतर्फी प्रेम करणार्‍याने तू मला भेटत का नाही. माझे तुझ्यावर प्रेम आहे. तू मला खूप आवडतेस. तू माझी होऊ शकत नाही तर, कोणाचीही होऊ देणार नाही, असे म्हणून शिवीगाळ करत लाकडी दांड्याने हातावर आणि डोक्यावर प्राणघातक हल्ला केला आहे. रक्तबंबाळ महिला जिवाच्या आकांताने ओरडत असताना एकजण जवळ आल्याने हल्लेखोर तेथून पळाला. या महिलेवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी महिलेने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत आरोपीला अटक केली आहे.

शहरात महिलांवरचे अत्याचार, प्राणघातक हल्ले असे प्रकार थांबण्याचे नाव नाही. दर्शना पवार हत्येची घटना ताजी असतानाच सदाशिव पेठेत एका विद्यार्थिनीवर कोयत्याने हल्ला झाल्याची घटना घडली होती. अशातच पुन्हा एकतर्फी प्रेमातून महिलेला जिवे मारण्याचा प्रयत्न झाला आहे. संकेत शहाजी म्हस्के (वय २६, रा. संत गाडगे महाराज वसाहत, कोरेगाव पार्क) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी खराडी येथे नोकरी करतात. त्यांचा घटस्फोट झाला आहे. काही महिन्यांपूर्वी संकेत म्हस्के याच्याशी त्यांची भेट होऊन ओळख झाली होती. त्याचबरोबर 

आणखी एकाबरोबर त्यांची मैत्री झाली होती. दरम्यान, त्यांचा घटस्फोट झालेला पती पुन्हा त्यांच्या संपर्कात आला होता. संकेत म्हस्के याने एक महिन्यापूर्वी माझे तुझ्यावर प्रेम आहे, तू मला आवडते, असे म्हणून फिर्यादीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी मी तुझी फक्त मैत्रिण राहू शकते, असे सांगितले होते. त्याचा नंबर ब्लॉक केला होता. काही दिवसांनी त्यांनी त्याला पुन्हा अनब्लॉक केले.

फिर्यादी बुधवारी सकाळी सात वाजता बर्निग घाट येथे एका मित्राकडे आल्या होत्या. त्यावेळी तेथे आरोपी संकेत रिक्षातून आला. त्याने पाठीमागून येऊन फिर्यादीला पकडले. तू मला भेटत का नाही. 

माझे तुझ्यावर प्रेम आहे. तू मला खूप आवडते, तू माझी होऊ शकत नाही तर कोणाचीही होऊ देणार नाही, असे म्हणून शिवीगाळ करत त्याने लाकडी दांडक्याने फिर्यादीच्या हातावर जोरात मारले. त्या खाली पडल्यावर त्यांच्या डोक्यात मारून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या डोक्यातून रक्त येत असल्याचे पाहून आरोपी संकेत म्हस्के पळून गेला. फिर्यादी यांच्यावर येरवड्यातील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. हा प्रकार कोरेगाव पार्क येथील बर्निंग घाट येथे घडला.

फिर्यादी खराडी येथील खासगी कंपनीत मागील नऊ वर्षांपासून नोकरी करत आहेत. त्यांचा २००६ साली विवाह झाला होता. त्यानंतर २०१८ साली घटस्फोट झाला आहे. त्यांचा पती पुन्हा त्यांच्या संपर्कात आला. यातील आरोपी संकेत शहाजी म्हस्के याच्यासोबत फिर्यादी महिलेची ४ महिन्यांपूर्वी कोरेगाव पार्क भागात भेट होऊन ओळख झाली होती. त्याचे रूपांतर मैत्रीत झाले. नंतर ते नाष्टा, जेवण करण्यास अधूनमधून भेटत होते. मात्र आरोपी संकेत

 म्हस्के हा एक महिन्यापासून फिर्यादी महिलेला "तू मला आवडते. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे".  असे म्हणत जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी महिलेने मी तुझी फक्त मैत्रिण म्हणून राहू शकते, असे सांगितले. या रागातून आरोपीने महिलेला शिवीगाळ केली होती. तेव्हापासून महिला आरोपीला टाळत होत्या. त्याचा फोनही घेत नव्हत्या.

घटनास्थळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलीमा पवार यांनी भेट दिली. आरोपीला न्यायालयाने चार दिवसांची 

पोलीस कोठडी दिली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश वराळ करत आहेत. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story