पतीनेच केला मित्रांसमवेत बलात्कार

चार मित्रांना सोबत घेऊन पतीनेच पत्नीवर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत महिलेच्या वडिलांनी जावयासोबत त्याच्या चार मित्रांच्या विरोधात मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विवाहित महिलेची इच्छा नसतानाही पती आणि त्याचे मित्र धमकावून तिच्यावर बलात्कार करत होते. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला असून पुढील तपास करत आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Nitin Gangarde
  • Mon, 26 Jun 2023
  • 08:55 am
पतीनेच केला िमत्रांसमवेत बलात्कार

पतीनेच केला मित्रांसमवेत बलात्कार

व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी देत वेळोवेळी सामूहिक बलात्कार

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

चार मित्रांना सोबत घेऊन पतीनेच पत्नीवर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत महिलेच्या वडिलांनी जावयासोबत त्याच्या चार मित्रांच्या विरोधात मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विवाहित महिलेची इच्छा नसतानाही पती आणि त्याचे मित्र धमकावून तिच्यावर बलात्कार करत होते. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला असून पुढील तपास करत आहेत.

पती मारहाण करत असल्याने वडील मुलीला माहेरी घेऊन गेले होते. मात्र पती तिला घरी परत बोलावत होता. तेव्हा पतीने आपल्या पत्नीला बाहेर बोलावून तिची इच्छा नसताना शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर त्याच्या इतर चार मित्रांनी आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला. बलात्कार केल्याचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. तो व्हीडीओ सगळीकडे प्रसारित करण्याची धमकी देत महिलेवर वारंवार सामुदायिक बलात्कार केल्याचा घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार मार्केट यार्डातील परिसरात २७ फेब्रुवारी २०२० ते २०२१ दरम्यान घडला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

मार्केट यार्ड पोलिसांनी फिर्यादीचा जावई आणि त्याच्या चार मित्रांवर गुन्हा दाखल केला आहे. शैलेंद्रकुमार अतिशयकुमार, जितेंद्रकुमार, पवन राजेंद्र परदेशी, विजय बन्सी पवार यांच्यासह महिलेच्या पतीने आळीपाळीने बलात्कार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादी यांच्या २३ वर्षाच्या मुलीचा औरंगाबाद  शहरातील गारखेडा येथील तरुणाबरोबर विवाह झाला होता. तो दारू पिऊन तिला वारंवार मारहाण करत होता. त्याच्या त्रासाला वैतागून मुलगी वडिलांसोबत माहेरी गेली होती.

पोलिसांनी भारतीय दंड विधानातील विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे तपास करत आहेत. या प्रकरणाची चौकशी सुरू असून, लवकरात लवकर दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस निरीक्षक सविता ढमढेरे यांनी 'सीविक मिरर'शी बोलताना सांगितले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story