घटना एक; शवविच्छेदन अहवाल मात्र दोन

पारगाव ( ता. दौंड ) येथील हत्याकांडातील पहिल्या व नंतरच्या शवविच्छेदन अहवालाची छाननी करण्यात येईल, दोन्ही अहवालांच्या निष्कर्षावरून पुढील तपास केला जाणार असल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी शनिवारी पारगाव येथे दिली.

पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी

दौंड हत्याकांड: तपासात न्यायवैद्यक टिमची मदत; दोन्ही अहवालांची छाननी

सीविक मिरर ब्यूरो

feedback@civicmirror.in

पारगाव ( ता. दौंड ) येथील हत्याकांडातील पहिल्या व नंतरच्या शवविच्छेदन अहवालाची छाननी करण्यात येईल, दोन्ही अहवालांच्या निष्कर्षावरून पुढील तपास केला जाणार असल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी शनिवारी पारगाव येथे दिली.

पारगाव येथे भीमा नदीपात्रात मागील आठवड्यात एकाच कुटुंबातील सातजणांचे मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. या आत्महत्या आहेत की हत्या याबाबत प्रारंभी संभ्रम होता. यवत येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून 'पाण्यात बुडून मृत्यू' असा शवविच्छेदन अहवाल देण्यात आला होता. मात्र नातेवाईकांकडून हे 

हत्याकांड झाल्याचे तपासात समोर आल्याने या घटनेने मोठे वळण घेतले. त्यामुळे दफन केलेल्या राणी फुलवरे, शाम फुलवरे, संगीता पवार यांचे मृतदेह पुन्हा बाहेर काढून त्यांचे न्याय सहायक तज्ञ समितीद्वारे फेर शवविच्छेदन करण्यात आले. या गुन्ह्यात एका 

अल्पवयीनासह पाचजणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले वाहन पोलिसांनी जप्त केले आहे.

सुनील फुलारी यांनी घटनास्थळाला भेट देऊन शनिवारी पाहणी केली. ते म्हणाले, पारगाव हत्याकांडात वैद्यकीय, कायदेविषयक आणि न्यायवैद्यक टिमची मदत घेण्यात आली आहे. सायबर न्यायवैद्यक व डिजिटल न्यायवैद्यक विभागाची मदत घेतली जाणार आहे. एकंदरीत घटनाक्रम, त्यांच्या वेळा, त्याची सुसंगती, आरोपींचा सहभाग, प्रत्येकाची भूमिका याबाबत बारकाईने छाननी करण्यात येणार आहे. मृतदेहावरील जखमा, त्याचा व्हिसेरा आणि शास्त्रोक्त तपासणीचे अहवाल आमच्या तपास अधिकाऱ्याला मिळतील, या गुन्ह्यात आणखी कोणी साहाय्य केले आहे का, याबाबत तपास चालू आहे.

यवत येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा शवविच्छेदन अहवाल व पोलिसांचा तपास या दोन टोकाच्या गोष्टी तपासात पुढे आल्या आहेत. दफन केलेल्या तीन मृतदेहांचे फेर शवविच्छेदन करण्यात आले आहे. आरोग्य खात्याकडून त्यातील ज्या त्रुटी आहेत त्यावर सविस्तर उत्तर घेण्यात येणार आहे. ससूनचे अधिष्ठाता या अहवालांची छाननी करत आहेत. सुरुवातीला ही सामूहिक आत्महत्या असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र, आता या प्रकरणाने धक्कादायक वळण घेतले आहे. कुटुंबातील नातेवाईकांनीच संपूर्ण कुटुंबाची हत्या केल्याचे समोर आले. मोहन पवार यांच्या चुलत भावांनी पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांना मारून नदीत फेकून दिल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यावरून पोलिसांनी चारजणांविरुद्ध गुन्हा नोंद करून अटक केली आहे.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story