Forcing a minor : अल्पवयीन मुलाला जबरदस्तीने कबुतराची विष्टा खायला घातली

कबूतर घेतल्याच्या किरकोळ वादातून चौघाजणांनी एका १२ वर्षाच्या मुलाला कबुतरांची विष्टा खाऊ घातल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे. या प्रकरणी मुलाच्या वडिलांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Nitin Gangarde
  • Fri, 28 Jul 2023
  • 01:24 am
अल्पवयीन मुलाला जबरदस्तीने कबुतराची विष्टा खायला घातली

अल्पवयीन मुलाला जबरदस्तीने कबुतराची विष्टा खायला घातली

कात्रजमधील धक्कादायक घटना, चौघांवर गुन्हा दाखल

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

कबूतर घेतल्याच्या किरकोळ वादातून चौघाजणांनी एका १२ वर्षाच्या मुलाला कबुतरांची विष्टा खाऊ घातल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे.  या प्रकरणी मुलाच्या वडिलांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.  

ही घटना कात्रजमधील संतोषीमाता मंदिराच्या मागील बाजूस मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता घडली. फिर्यादी कात्रज परिसरात राहतात. २५ जुलै रोजी तिघाजणांनी फिर्यादीच्या मुलाला जबरदस्तीने दुचाकीवरून नेले. त्याला मारहाण करत जिवंत मारून टाकतो अशी धमकी दिली. यातील एकाकडे लोखंडी धारदार हत्यार होते. त्याने हत्यार हवेत फिरवून मध्ये कोणी आले तर तोडून टाकीन अशी धमकी दिली. त्यामुळे सर्व लोक पळून गेले. याची माहिती फिर्यादींना समजताच त्यांनी मुलाचा शोध घ्यायला सुरुवात केली. मुलगा सापडत नसल्याचे पाहून वडिलांनी कात्रज पोलिसांत तक्रार दिली. काही वेळाने मुलगा घरी आल्याचे त्याच्या वडिलांना कळले. पोलिसांनी घरी मुलाची विचारपूस केल्यावर त्याने कबुतर आणल्यामुळे  तिघांनी मिळून मला मारहाण केल्याचे सांगितले. तसेच दुचाकीवरून जबरदस्तीने साई अपार्टमेंटवर नेले. तेथे मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच एकाने कबुतराची विष्ठा आणली. इतर तिघांनी आपल्याला पकडून ठेवले आणि जबरदस्तीने कबुतराची विष्टा खाण्यास भाग पाडले. पुन्हा आमच्याकडे कबुतर न्यायला आला तर तुला जिवंत ठेवणार नाही आणि पोलिसांना आमचे घर दाखविले तर तुला खल्लास करीन अशी धमकीही दिली. या प्रकरणी  चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक वर्षा तावडे तपास करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story