महापालिकेच्या दुर्लक्षामुळे उद्यान झालेय भयाण

घोरपडे पेठ येथील पुणे महापालिकेच्या घोरपडे उद्यानाची कमालीची दुरावस्था झाली आहे. त्यात कचऱ्याचे ढीग, सीसीटीव्ही कॅमेऱ्याची मोडतोड झाली असून त्यात काही नशा करणारे याचा आसरा घेत असल्याने नागरिकांना असुरक्षित वाटत असून ते उद्यानात जायला घाबरत आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Nitin Gangarde
  • Sun, 25 Jun 2023
  • 12:13 am
महापालिकेच्या दुर्लक्षामुळे उद्यान झालेय भयाण

महापालिकेच्या दुर्लक्षामुळे उद्यान झालेय भयाण

घोरपडे उद्यानाची दुरवस्था, नशा करणाऱ्यांचा वावर, नागरिकांना वाटतेय असुरक्षित

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

घोरपडे पेठ येथील पुणे महापालिकेच्या घोरपडे उद्यानाची कमालीची दुरावस्था झाली आहे. त्यात कचऱ्याचे ढीग, सीसीटीव्ही कॅमेऱ्याची मोडतोड झाली असून त्यात काही नशा करणारे याचा आसरा घेत असल्याने नागरिकांना असुरक्षित वाटत असून ते उद्यानात जायला घाबरत आहेत.

घोरपडे उद्यान आणि साठे उद्यानाकडे महापालिकेचे कमालीचे दुर्लक्ष झालेले असून मागील एक वर्षापासून त्याची दुरवस्था झालेली पाहावयास मिळते. उद्यानातील काही विजेचे दिवे बंद असल्याचे उद्यानाच्या काही भागात काळोख पसरलेला असतो. कचऱ्याचे आणि झाडाच्या वाळलेल्या पालापाचोळ्याचे ढीग जागोजागी पडलेले आढळून येत आहेत. पदपथावर झाडांच्या फांद्या येत असल्याने नागरिकांना चालण्यास अडचण येत आहे. तसेच येथे आवश्यक सूचनाफलक लावण्यात आलेले नाही. उद्यानाच्या समोरच वाहने उभे केले जात आहेत. येथील अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मोडतोड झाली असून या सर्व कारणांमुळे नशेखोर नशा करण्यासाठी या उद्यानाचा आसरा घेत आहेत. सगळ्या वयोगटातील नागरिकांना जवळचे वाटणाऱ्या उद्यानाची पालिकेच्या दुर्लक्षामुळे दुरावस्था झाल्याचे ऋषिकेश बालगुडे यांनी ‘सीविक मिरर’ला सांगितले.

उद्यानात व्यायाम करण्यासाठी, फिरण्यासाठी, विद्यार्थी अभ्यासाठी, अनेक जण हितगुज, गप्पा गोष्टी करण्यासाठी येत असतात. मात्र महापालिका त्याची व्यवस्थित देखभाल करत नसल्याने नागरिकांना त्याचा लाभ घेता येत नाही. पिण्याच्या पाण्याच्या टाकीची नियमित स्वच्छता होत नसल्याने पिण्यासाठी पाणी मिळत नाही. हे ठिकाण आजूबाजूच्या शाळा महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी एक उत्तम स्थळ आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे अनेक विध्यार्थी प्रसन्न वातावरणात शांतचित्ताने अभ्यास करण्यासाठी त्याला पसंती देतात. परंतु येथे कायम पडीक आसलेल्या नशेखोरांमुळे महिला तसेच मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याचे नागरिक सांगत आहेत. याठिकाणी पालिकेच्या दोन महिला सुरक्षारक्षक असतात त्यांच्या सोबतीला एका पुरुष सुरक्षारक्षकाची आवश्यकता असल्याचे बालगुडे यांनी सांगितले.  तसेच येथे आवश्यक सूचनांचे फलक लावण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

पालिकेच्या अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी येथे भेट देऊन पाहणी केली. येथील गवत वाढलेले आहे, तसेच पालापाचोळा वाढलेला आहे. याची त्यांनी पाहणी केली होती. परंतु निविदा नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. याबतीत मुख्य उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की ‘‘या उद्यानाची नियमित देखभाल करण्यात येत आहे. आता पुढील देखभालीसाठीच्या निविदा लवकरच काढण्यात येतील.’’

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story