दर गुरुवारी शहरभर पाणी कपात लादूनही धनवानांना आतल्या मार्गाने टँकरद्वारे पुरवठा सुरूच राहतो.

शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत पाणी साठा कमी असल्याने महापालिकेने शहरातील पाणी पुरवठा गुरुवारी बंद होता. दुसऱ्या बाजुला टँकरमधून होणारा पाणी पुरवठा सुरु असल्याचे दिसत होते. पद्मावती पंपिंग, पर्वती जलशुद्धीकरण केंद्र येथे गुरुवारी पाणी भरण्यासाठी टँकरची रांग लागलेली होती.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Nitin Gangarde
  • Thu, 15 Jun 2023
  • 11:41 pm
दर गुरुवारी शहरभर पाणी कपात लादूनही धनवानांना आतल्या मार्गाने टँकरद्वारे पुरवठा सुरूच राहतो.

दर गुरुवारी शहरभर पाणी कपात लादूनही धनवानांना आतल्या मार्गाने टँकरद्वारे पुरवठा सुरूच राहतो.

दर गुरुवारी शहरभर पाणी कपात लादूनही धनवानांना आतल्या मार्गाने टँकरद्वारे पुरवठा सुरूच

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत पाणी साठा कमी असल्याने महापालिकेने शहरातील पाणी पुरवठा गुरुवारी बंद होता. दुसऱ्या बाजुला टँकरमधून होणारा पाणी पुरवठा सुरु असल्याचे दिसत होते. पद्मावती पंपिंग, पर्वती जलशुद्धीकरण केंद्र येथे गुरुवारी पाणी भरण्यासाठी  टँकरची रांग लागलेली होती. येथे २० टँकर पाणी भरण्यासाठी रांगेत थांबले होते. एकीकडे धरणात पाणी साठा कमी आहे म्हणून बचतीच्या कारणासाठी नागरिकांवर कपात लादली जात असताना दुसरीकडे पाणी भरण्यासाठी टँकरच्या रांगा लागलेल्या होत्या. त्यामुळे टँकरवाल्यांच्या फायद्यासाठी नागरिकांवर पाणी कपात लादली का असा संतप्त सवाल नागरिक विचारत होते. 

गुरुवारी शहरातील पाणी पुरवठा बंद ठेवला असताना पद्मावती पंपिंग स्टेशन, पर्वती जलशुद्धीकरण केंद्र येथे पाण्याचे शेकडो टँकर भरून वेगवेगळ्या ठिकाणी जात असल्याचे दिसून आले आहे. शिवाय कित्येक टँकर पाणी भरण्यासाठी  रांगेत उभे असल्याचे दिसून आले. गुरुवारी पुणे शहरामध्ये पाणीपुरवठा बंद असतो तर मग हा नियम टँकरला का लागू होत नाही, असा प्रश्न राष्ट्रवादी अर्बन सेलचे अध्यक्ष नितीन कदम यांनी उपस्थित केला. प्रामाणिकपणे मिळकत कर भरणाऱ्या नागरिकांची पालिका प्रशासन फसवणूक करत आहे. धरणातील कमी झालेला पाणीसाठा आणि लांबलेल्या पावसामुळे पाणी कपातीची झळ सोसूनही ते सहकार्याची भूमिका ठेवत निमुटपणे कपात सहन करत आहेत. मात्र प्रशासन आतुन टँकर माफियांना प्रोत्साहन देत असल्याचे स्पष्ट होत आहे.

गुरुवारी पाणी भरण्यासाठी टँकरची भली मोठी रांग होती. काही पाणी भरत होते तर काही रांगेत होते. एक टँकर दिवसातून पाण्याच्या ५ ते ६ खेपा करतो. दुसरीकडे सामान्य नागरिक पाण्यासाठी धावधाव करत होते. पालिका पाणी कपातीत असा भेदभाव का करते ? टँकरला अशी सवलत देऊन प्रशासन नागरिकांवर अन्यायच करत आहे. याची तातडीने चौकशी करून संबंधितांवर कठोर करावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा कदम यांनी दिला आहे.

पुण्यााला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पात सध्या फक्त पाच अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी शिल्लक आहे. जिल्ह्यातील बहुतांश धरणांमधील पाणीसाठ्याने तळ गाठल्याचे जलसंपदा विभागाच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. 

त्यामुळे येत्या काही आठवड्यांत जिल्ह्यात पाऊस न झाल्यास पाणीटंचाईच्या संकटाला सामोरे जावे लागण्याची भीती आहे. खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरणांतून पुणे शहराला पिण्यासाठी पाणीपुरवठा करण्यात येतो. या चारही धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत ५.०५ टीएमसी (१७.३१ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. खडकवासल्यामध्ये १.०३ टीएमसी, पानशेतमध्ये १.३५ टीएमसी, वरसगाव धरणामध्ये २.५३ टीएमसी आणि टेमघरमध्ये ०.१३ टीएमसी पाणी शिल्लक आहे. मॉन्सून अजून राज्यात बरसलेला नाही. त्यामुळे आठवड्यातील एक दिवस कपात आणखी वाढणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. आजमितीला शहराला दररोज १६५० एमएलडी पाणी लागते. त्यातच पाणीसाठा कमी झाल्याने बचत म्हणून पालिकेने पाणी कपात करत असल्याचे सांगितले.  मात्र, दुसऱ्या बाजूला टँकर वाल्यांचे खिसे भरले जातील याची काळजी पालिका घेत असल्याचे नागरिक सांगत आहेत.

 "टँकर भरण्यासाठी चलन भरल्याच्या पावत्या घेणे आवश्यक आहे. रविवारी चलन घेण्याचे बंद असतानाही टँकर भरले जातात. ते पूर्वीच्या पावत्या दाखवून भरले जातात. सुट्टी असो की गुरवार असो मात्र टँकर त्या दिवशीही भरले जातात. पर्वती जलशुद्धीकरण केंद्रावर हा प्रकार सर्रास सुरु आहे." असे राहुल तुपेकर यांनी ‘सीवीक मिरर’शी बोलताना सांगितले.  

पाणी कपातीच्या दिवशी गुरुवारी टँकर बंद असतील असे प्रशासनाने सांगितले होते. मात्र ते भरले जात असतील तर टँकर लॉबीला धंदा मिळावा म्हणून कपात करण्याचा पालिकेने 'उद्योग' केला आहे. धरणात पाणी पुरवठा अजूनही भरपूर आहे. आता जून महिना आहे. पाऊस कितीही उशिरा आला तरी जुलै महिन्यात येतोच. त्यामुळे गरज नसताना कपात केली आहे. ही कपात टँकर लॉबीसाठी केली असेल तर नागरिकांसाठी हा खूपच वाईट निर्णय आहे, असे मत सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी व्यक्त केले. 

पर्वतीचा टँकर पॉईंट हा गुरुवारी बंदच आहे. ज्या भागात पाण्याची अडचण आहे तेथे रोजच टँकर द्यावे लागतात. या भागासाठी पद्मावती हा एकच टँकर पॉईंट आहे. तेथून ज्या भागाला टँकर भरती बंद आहे तो सोडून इतरत्र पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे पद्मावती टँकर पॉईंट गुरुवारी चालू असतो. 

- अनिरुद्ध पावसकर, अधिक्षक अभियंता पाणी पुरवठा विभाग

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story