पालखीमुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे रविवारी ( ११ जून) देहू येथून प्रस्थान होणार असून तिचा पहिला मुक्काम देहूगाव येथील इनामदार वाड्यात होणार आहे. त्यानंतर तिचे देहूगाव येथून आकुर्डीकडे प्रस्थान होणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीतून ११ जून रोजी निघणार आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Nitin Gangarde
  • Sun, 11 Jun 2023
  • 12:01 am
पालखीमुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

पालखीमुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

पालख्या पुण्यातून प्रस्थान करेपर्यंत पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे पुणे शहर वाहतूक विभागाचे आवाहन

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे रविवारी ( ११ जून) देहू येथून प्रस्थान होणार असून तिचा पहिला मुक्काम देहूगाव येथील इनामदार वाड्यात होणार आहे. त्यानंतर तिचे देहूगाव येथून आकुर्डीकडे प्रस्थान होणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीतून ११ जून रोजी निघणार आहे. तिचा  पहिला मुक्काम गांधीवाडा आळंदी येथे असेल. त्यानंतर १२ जून रोजी (सोमवारी) दोन्ही पालख्या पुणे शहराकडे प्रस्थान करणार आहेत. संत श्री तुकाराम महाराज आणि संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या पुणे शहरात १२ जून रोजी एकत्रित येणार आहेत. पालखीच्या आगमनानिमित्त पुणे शहरात वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.

संत तुकाराम महाराजांची पालखी विठ्ठल मंदिर, आकुर्डी येथून निघून पुण्यात येणार आहे, त्यामुळे चिंचवड, पिंपरी परिसरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले असून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पालखी बोपोडी चौकात पोहचेपर्यंत बोपोडी चौक ते खडकी बाजार हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असून नागरिकांना अंतर्गत रस्त्याचा वापर करता येणार आहे. बोपोडी चौक ते चर्च चौक रस्त्याऐवजी भाऊ पाटील रस्ता,

 ब्रेमेन चौक, ते औंध मार्गे वाहतूक सुरू असणार आहे.  पोल्ट्री फार्म चौक रस्त्याला पर्याय म्हणून रेल्वे पोलीस मुख्यालयासमोरून औंध रास्ता, ब्रेमेन चौक खुला असेल. मुळा ते कमल नयन बजाज उद्यान चौकापर्यंतचा रस्ता बंद ठेवण्यात येणार असून नागरिकांनी अंतर्गत रस्त्याचा वापर करावा, असे वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले आहे.

पालखी अभियांत्रिकी महाविद्यालय चौकात येईपर्यंत बोपोडी चौक ते अभियांत्रिकी महाविद्यालयापर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. जुन्या  मुंबई-पुणे महामार्गावरून पुण्याकडे येणारा रस्ता वाहनांसाठी बंद असेल. त्यासाठी बोपोडी चौकातून पुणे-मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांनी भाऊ पाटील रस्त्यावरून औंध मार्गे ब्रेमेन चौकातून जावे. आरटीओ ते अभियांत्रिकी महाविद्यालय चौक बंद असेल. त्याऐवजी दोन पर्यायी मार्ग उपलब्ध आहेत. आरटीओ चौक ते शाहीर अमर शेख चौक, कुंभार वेस चौक वाहतुकीसाठी  खुला असेल. आरटीओ चौक ते जहांगीर चौक, आंबेडकर सेतू ते गुंजन मार्ग सुरू असेल. सादलबाबा दर्गा ते पाटील इस्टेट चौक हा मार्ग बंद असून त्याऐवजी पर्णकुटी चौक, बंडगार्डन ब्रिज, महात्मा गांधी चौक हा खुला असेल.

संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोमवारी (१२ जून) आळंदी येथून पुण्यात येणार असल्याने पहाटे २ वाजल्यापासून काही रस्ते बंद असतील. कळस फाटा ते बोपखेल फाटा, विश्रांतवाडी चौक हा मार्ग बंद असेल. त्यासाठी धानोरी आणि आणि अंतर्गत रस्त्याचा वापर करावा. मेंटल हॉस्पिटल कॉर्नर ते आळंदी रोड जंक्शन बंद असून त्यासाठी जेल रस्ता, विमानतळ रस्त्याचा पर्याय देण्यात आला आहे. सादलबाबा दर्गा ते पाटील इस्टेट रस्ता वाहतुकीसाठी बंद असेल. त्यामुळे पर्णकुटी चौक, गुंजन चौक, जेल रस्ता, ग्यारीसन इंजिनिअरिंग चौक, विश्रांतवाडी चौक वाहतुकीसाठी खुला असेल. चंद्रमा चौक ते आळंदी रस्ता,  नवीन आंबेडकर सेतू ते चंद्रमा चौक, होळकर ब्रिज ते साप्रस चौक हे रस्ते वाहतुकीसाठी बंद असतील. त्याठिकाणी अंतर्गत रस्त्यांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या वेळेत फक्त आळंदीकडे जाणारे रस्ते बंद राहणार असून इतर रस्ते वाहतुकीसाठी खुले राहणार आहेत.

दोन्ही पालख्या सोमवारी निवडुंग्या विठोबा मंदिर, नाना पेठ, भवानी पेठ, पुणे येथे मुक्कामास येणार असल्याने त्यांचा मार्ग वाहतुकीसाठी दुपारी १२ वाजल्यापासून बंद असेल. रेंजहिल्स चौक ते संचेती चौक गणेशखिंड रस्ता वाहतुकीसाठी बंद असेल. त्याऐवजी रेंजहिल्स, खडकी पोलीस स्टेशन, पोल्ट्री चौक, जुना मुंबई पुणे महामार्ग सुरू राहील. खंडोजीबाबा चौक ते वीर चाफेकर चौक फर्ग्युसन रस्ता बंद असेल. त्याला पर्याय म्हणून खंडोजीबाबा चौक, सेनापती बापट रस्ता, रेंजहील हा मार्ग वाहतुकीसाठी खुला असेल. गाडीतळ पुतळा ते स. गो बर्वे (शिवाजी रोड) मार्ग बंद असेल. त्याला गाडीतळ पुतळा, कुंभार वेस चौक, आरटीओ चौक, जहांगीर मार्ग हा पर्याय उपलब्ध असेल. वीर चाफेकर चौक ते वाकडेवाडी भुयारी मार्ग बंद असेल. त्याऐवजी

पोल्ट्री फार्म चौक, रेंजहिल्स या मार्गाचा वापर करता येणार आहे. डेक्क्कन वाहतूक विभाग ते थोपटे पथ चौक (मॉडर्न कॉलेज रोड) वाहतुकीसाठी बंद असेल. त्याऐवजी घोले रोड, आपटे रस्त्यावरील वाहतूक सुरू असेल.  कुंभार वेस चौक ते गाडीतळ पुतळा चौक आणि मालधक्का ते शाहीर अमर शेख चौक वाहतुकीसाठी बंद असेल. तसेच पालखी  तुकाराम पादुका ते बेलबाग चौकात येईपर्यंत टिळक चौक ते वीर चाफेकर चौक, फर्ग्युसन रस्ता , शिवाजी रास्ता, कुंभार वेस चौक ते गाडीतळ पुतळा, शास्त्री रोड सेनादत्त चौकाजवळ, शेलारमामा चौक ते खंडोजीबाबा चौक, टिळक रस्ता ते लोकमान्य टिळक चौक ( अलका टॉकीज), लक्ष्मी रस्ता-बेलबाग ते टिळक चौक, शिवाजी रस्ता ते जिजामाता चौक ते बुधवार चौक, लक्ष्मी रोड-संत कबीर चौक, बेलबाग चौक, शनिपार चौक ते सेवा सदन चौक, नेहरू चौक ते सोन्या मारुती चौक ही ठिकाणे वाहतुकीसाठी बंद असतील.

मेट्रोचे काम ७ दिवस बंद

पालखी मार्गावर पुणे मुंबई रस्ता, गणेशखिंड रस्ता परिसरात मेट्रोचे काम सुरू असून शहराच्या अन्य भागातही काम वेगाने सुरू आहे. पालखी सोहळ्यादरम्यान मेट्रोची बहुतांश कामे बंद ठेवण्यात येणार आहेत. प्रामुख्याने या कामासाठी सुरू असलेली अवजड वाहतूक सात दिवस बंद ठेवण्यात येणार आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story