संगणक अभियंत्याच्या पत्नीने ९ व्या मजल्यावरून मारली उडी

चिंचवडमधील मोशी येथे एका विवाहित महिलेने राहत्या घराच्या इमारतीवरून उडी मारत स्वतःचे आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मानसिक तणावातून ही आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी 'सीविक मिरर'शी बोलताना दिली आहे. श्रीशा मुरली वेंगला (वय ३१ वर्षे). असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Nitin Gangarde
  • Wed, 5 Jul 2023
  • 08:54 am
संगणक अभियंत्याच्या पत्नीने  ९ व्या मजल्यावरून मारली उडी

संगणक अभियंत्याच्या पत्नीने ९ व्या मजल्यावरून मारली उडी

चिमुकल्याला खाऊ घालणाऱ्या पतीला पाठवले अंघोळीला; महिनाभरापासून मानसिक तणावात असल्याचा पतीचा दावा

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

चिंचवडमधील मोशी येथे एका विवाहित महिलेने राहत्या घराच्या इमारतीवरून उडी मारत स्वतःचे आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मानसिक तणावातून ही आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी 'सीविक मिरर'शी बोलताना दिली आहे. श्रीशा मुरली वेंगला (वय ३१ वर्षे). असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. मंगळवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.

भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे यांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीशा या आपल्या पती व लहान मुलासह मागच्या तीन महिन्यांपासून पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी या ठिकाणी सह्याद्री सोसायटीमध्ये राहात आहेत. वेंगला कुटुंब हे मूळचे तेलंगणा राज्यातील आहे. श्रीशा यांचा पती संगणक अभियंता आहे. तो पिंपरी-चिंचवड शहरातील एका खासगी कंपनीत काम करत आहे, तर मृत महिला श्रीशा या गृहिणी होत्या. मागील काही दिवसांपासून त्या तणावात असल्याचे त्यांच्या पतीने पोलिसांना सांगितले आहे.

मंगळवारी सकाळी श्रीशा आणि त्यांचे पती हे नेहमीप्रमाणे घरातील आपापले काम करत होते. त्यांचा पती लहान मुलाला जेऊ घालत होता. त्यावेळी श्रीशा त्यांना ओरडून म्हणाल्या, तुम्ही अंघोळ करून घ्या, मी बाळाला खाऊ घालते. श्रीशा यांनी सुचवल्यानुसार त्यांचा पती अंघोळीला गेला होता. त्याचवेळी श्रीशा यांनी अंघोळ करणाऱ्या पतीला ओरडून, मी स्वतःला संपवत असल्याचे सांगत घराच्या गॅलरीतून उडी मारली. ते सह्याद्री सोसायटीत नवव्या मजल्यावर राहतात. इतक्या उंचावरून उडी घेत श्रीशा खाली आपटल्या. त्यामुळे रक्तस्राव सुरू झाला. अचानक मोठा आवाज झाल्याने शेजारचे लोक धावत घटनास्थळी जमले. त्यावेळी श्रीशा रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. अंघोळ करत असलेला त्यांचा पती बाहेर येऊन मुलाला घेऊन पळत खाली आला.  या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

काळीज पिळवटून टाकणारी ही घटना सोसायटीमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. श्रीशा यांचे नातेवाईक तेलंगणा येथून पिंपरी-चिंचवडला येत आहेत. ते पोहचेपर्यंत त्यांनी पोलिसांना पुढील कायदेशीर प्रक्रिया थांबवायला सांगितली आहे. नातेवाईक पोहचल्यावर पुढील कायदेशीर प्रक्रिया पार पाडली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story