पोलिसांशी हुज्जत पडली महागात

रात्रीच्या वेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांनी हॉटेल बंद करण्याचे सांगितल्यावरही हॉटेलचालकाने त्यांचे न ऐकून थेट वरिष्ठ पोलीस निरीक्षकाशी हुज्जत घालून त्यांना धमकावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संबंधित हॉटेल चालकावर डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Nitin Gangarde
  • Mon, 17 Jul 2023
  • 11:31 pm
पोलिसांशी हुज्जत पडली महागात

पोलिसांशी हुज्जत पडली महागात

मध्यरात्री हॉटेल सुरू ठेवणाऱ्यास अटक; दोन दिवस पोलीस कोठडी

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

रात्रीच्या वेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांनी हॉटेल बंद करण्याचे सांगितल्यावरही हॉटेलचालकाने त्यांचे न ऐकून थेट वरिष्ठ पोलीस निरीक्षकाशी हुज्जत घालून त्यांना धमकावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संबंधित हॉटेल चालकावर डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. डेक्कन येथील पुलाखाली नदीपात्रात रविवारी मध्यरात्री दीड वाजता सुरू असलेल्या हॉटेल सदगुरूबाबत हा प्रकार घडला. या वेळी हॉटेल चालकाने गुन्हे शाखा युनिट ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्याशी हुज्जत घातली. या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

मध्यरात्री शहरात बहुतांश ठिकाणी हॉटेल, हातगाड्या नियबाह्य सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळते. यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस गस्त घालून हॉटेलचालकांना हॉटेल बंद करण्यास सांगत आहे, तसेच रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या हॉटेल, हातगाड्यांवर कारवाईदेखील केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर डेक्कनच्या नदीपात्रातील हॉटेल सद्गुरूच्या चालकाला पोलिसांनी हॉटेल बंद करण्यास सांगितले होते. मात्र, त्यान हुज्जत घातली. त्यानंतर चालकास पोलीस ठाण्यात घेऊन गेल्यावर त्याने पोलीस निरीक्षक बहिरट यांना एकेरी आणि उद्धट भाषेत उत्तरे दिली आणि पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याला ढकलून दिले. 

सचिन हरीभाऊ भगरे  (वय ३३, रा. कबीर बाग, नारायण पेठ) असे संबंधित आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट (वय ५३) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रविवार मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास नदीपात्रात हा प्रकार घडला आहे.  

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट हे सध्या गुन्हे शाखेच्या युनिट ३ मध्ये कार्यरत आहेत. शनिवारी ते रात्रपाळीच्या कर्तव्यावर होते. विश्रामबाग विभागात गस्त घालत असताना त्यांचे पथक नदीपात्रात आले. त्या वेळी मध्यरात्री दीड वाजता तेथील हॉटेल सदगुरु सुरू असल्याचे त्यांनी पहिले. हॉटेल बंद करण्याची वेळ उलटून गेली असतानाही ते सुरू असल्यामुळे त्यांनी चालकाला हॉटेल बंद करायला सांगितले. मात्र, सचिन भगरेने हॉटेल बंद करण्याऐवजी पोलीस निरीक्षकांशीच हुज्जत घातली. त्यामुळे पोलिसांनी त्याला डेक्कन पोलीस ठाण्यात नेले. तेथे भगरेने फिर्यादी यांना काय करायचे ते कर, असे एकेरी भाषेत बोलून फिर्यादींचा हात झटकला. पोलीस ठाण्यातील अंमलदारांना ढकलले. याबाबत पोलीस निरीक्षक गुन्हे शंकर साळुंखे तपास करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story