संग्रहित छायाचित्र
कीव्ह : युक्रेन हा रशियाला लागूनच असलेला छोटासा देश आहे. युद्धापूर्वी रशियन नागरिक युक्रेनमध्ये आपल्या सुट्ट्या घालवण्यासाठी जात असत. युक्रेनमध्ये रशियन भाषा बोलली जाते. असे असतानाच आंतराष्ट्रीय राजकारणाचा बळी ठरलेला युक्रेनमध्ये २४ फेब्रुवारी २०२२ रोजी रशियाने हल्ला केला. युक्रेनला आठवडाभरात गुडघे टेकायला लावू अशा आविर्भावात असणाऱ्या रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्याला मंगळवार (दि. १८) १००० दिवस पूर्ण झाले आणि म्हणूनच रविवारी (दि. १७) रशियाने युक्रेनच्या पॉवर ग्रिडवर सर्वांत मोठा हल्ला केला आहे.
हा हल्ला युक्रेनमध्ये हिवाळा सुरू होण्याच्या तोंडावर झाला आहे. युक्रेनी वृत्तानुसार, रशियाने २०० हून जास्त क्षेपणास्त्रे, ड्रोनने हल्ले केले. हल्ल्यामुळे राजधानी कीव्हसह अनेक राज्यांतील वीज गायब झाली. ३० लाखांहून जास्त लोक शून्य अंश तापमानाखाली अंधारात आहेत.
युक्रेन लवकरच पराभव मान्य करेल, असे वाटत होते. मात्र, जवळपास पावणे तीन वर्षांपासून युक्रेनी लष्कराने ना केवळ रशियन लष्कराला थोपवले आहे, तर त्याने हल्ला करून रशियाच्या कुर्स्क क्षेत्रावरही कब्जा केला आहे. युक्रेनला नमविण्यासाठी रशिया पॉवर ग्रिडवरील हल्ल्यामुळे निर्वाणीवर उतरला असल्याचे दिसून येते.
युक्रेनची वीज पायाभूत सुविधा उद्ध्वस्त, आता बंकरची मदत. रशियाने हिवाळा पाहता वीजपुरवठा खंडित करण्यासाठी युक्रेनच्या ऊर्जा ग्रीडला लक्ष्य केले. राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की म्हणाले की, रशियाने युक्रेनमधील अर्ध्या वीज पायाभूत सुविधा नष्ट केल्या आहेत. कीवने पाश्चात्य सहयोगी देशांना ऊर्जा ग्रीडच्या पुनर्बांधणीसाठी मदतीचे आवाहन केले आहे. युक्रेनमध्ये कडाक्याचा हिवाळा जवळ येत आहे. शेकडो युक्रेनियन लोकांनी घाबरून मेट्रो स्थानकांमध्ये बांधलेल्या बंकरमध्ये आश्रय घेतला आहे.
रशियाच्या या हल्ल्यानंतर पोलंड आणि नाटो सहकाऱ्यांनी रविवारी पहाटे सीमावर्ती क्षेत्रात आपल्या हवाई क्षेत्राच्या सुरक्षेसाठी विमाने रवाना केली. पोलंडच्या हवाई दलाच्या नेतृत्वाने सांगितले की, विमान जवळपास तीन तासांनंतर अन्य ठिकाणांवर परतले.
युरोपकडून मिळालेल्या एफ-१६ लढाऊ विमानांना देशाच्या संरक्षण हिश्शाच्या रूपात पाठवले. त्यात अनेक हवाई लक्ष्यांवर निशाणा साधला. त्यात सोव्हियत निर्मित सुखोई व मिग लढाऊ विमानांसोबत संरक्षण टीमचा समावेश होता. सन २०२२ मध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर दोन्ही देशांचे हजारो सैनिक मारले आहेत. संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार, या युद्धामध्ये कमीत कमी ११,७०० युक्रेनी नागरिक ठार झाले आहेत.
- झेलेन्स्की, राष्ट्राध्यक्ष युक्रेन
रशिया-युक्रेनच्या युद्धानंतर कोणताही पक्ष चर्चेसाठी उत्सुक दिसत नाही. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष निवडणूक जिंकणारे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, ते लवकरच युद्ध समाप्त करू शकतात. मात्र, ते कोणत्या पद्धतीने किंवा कुणाच्या बाजून पारडे झुकवतील हे स्पष्ट नाही.
स्कॉटलंडच्या सेंट अँड्रयू विद्यापीठात रणनीती विषयाचे प्रा. फिलिप्स ओ ब्रायन यांच्यानुसार, पूर्व युक्रेनमध्ये रशियाची रणनीती पुढे नेली जात आहे. ट्रम्प युक्रेनचा शस्त्र पुरवठा रोखून युद्ध समाप्ती करण्याचा प्रयत्न करू शकतात. डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनच्या मदतीत कपात केली आणि युद्धबंदीमुळे संघर्ष थांबल्यास रशिया शक्य तेवढे क्षेत्र सुरक्षित करण्याची शक्यता आहे. युक्रेनसाठी कोणत्याही युद्धबंदीची शक्यता पाश्चिमात्त्य देशांकडून रशिया भविष्यात पुन्हा हल्ला करणार नाही याची हमी घेणारी असू शकते.